मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पेशवाईचें संक्षिप्त वृत्त - जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - प्रभाकर Translation - भाषांतर जगदीश्वर कोपला गोष्ट झाली खरिच निरुपाई, म्हणून एकाएकीं सर्व बुडाली ब्राह्मणबाच्छाई ॥धृ०॥ सबळ वीरांचें राज्य पुरुष जे क्षणांत हरणारे आकाश कडकडल्यास सकल जे उचलुन धरणारे ॥ अणिक जागा जिंकुन सागरिचें स्त्रान सैन्यसमवेत जे करणारे, पूल बांधून नांवांचे जान्हवीनिर जे तरणारे । छत्रपतीच्या कामी शरिर जे खर्चुन मरणारे, उभे कंबर आंवळून वायुवत सदां जे फिरणारे ॥ स्वकर्म आचरणारे अभय जे बळी सर्वो ठाई, पहा त्यांचे वंशज हिंडती पृथ्वीवर पाईं ॥जगदी०॥ ॥१॥शके सोळाशे तिसापासुन राज्याची अमदानी, स्वतां खपुन कारखाने जमविले घरीं खावंदानी । कसे दप्तरीं लिहिणार लेख जे लिहिले मर्दांनीं, त्यांत चुकि नाहीं ठावि लेखणी कोरी कलमदानीं ॥ वेदशास्त्रसंपन्न मुखोदत वदति आनंदानीं, असे ब्राह्मण प्रतिसूर्य पाळिले त्यांच्या छंदानीं । शहर पुणें हरहमेष भरलें वाडे बांधिती घरवंदानी ॥ नळ वाहाती नित्यानी पाणी पीती हौदावर गाई, पुढें उघडे बाजार सुखें जन करती कमाई ॥जगदी०॥ ॥२॥प्रतिवर्षिक दक्षणा लक्ष ब्राह्मण श्रावणमासीं, असा धर्म आहे कुठें आवांतर कोण्या ग्रामासी । निरिच्छ योगी घ्याती गाती जे ईश्वरनामासी ॥ अन्न वस्त्र धन धान्य तयांच्या धाडिती घामासी । नंदादिप नैवेद्य ठाई ठाई विठ्ठल रामासी, उच्छाहास दिल्हे गांव सुभद्रासुताच्या मामासी ॥ कितीक विडे उचलून पावले मृत संग्रामासी । त्यांचे पुत्र पौत्रांस मागें नाहीं दुष्काळ दामासी ॥ मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई, मनुष्यमात्रादिकांचे माहेर होति पेशवाई ॥अगदी०॥ ॥३॥मूळ बाळाजी विश्वनाथ, सुत त्यांचे बाजीराव, नांव केले आपांनी लढविले वसइस उमराव ॥ राव बाजिचे पुत्र प्रभु बाळाजि बाजिराव, कनिष्ट दादा त्याहुन धाकडे जनार्दनराव । आपासाहेबांचे एक चिरंजिव सदाशिवरार, शूर होते विश्वासरासराव आणि गुणी माधवराव ॥ नारायणरावांचे सवाइ झाले माधवराव, रावसाहेब घेतल्या वरी जन्मले बाजीराव । चिमाजी आपा साहेब प्रसवली मग आनंदीबाई, विनायकराव बापुजी हे कांहीं किंचित सिपाई ॥जगदी०॥ ॥४॥पुरुष पंध्रांतुन पराक्रमी गत झाले अकरा, तदनंतर चौघांनी दिल्या आल्या शत्रुसर्वें टकरा । उपाय हरले ह्याच प्रसंगी गोष्ट गोलि निकरा, जो रक्षक आणिला तोच करी दौलतिचा विकरा ॥ हरण झालें सर्वस्व राहिला नाही त्यांतुन बकरा, गुप्त ठिकाण अजुन सांगती जा सत्व उकरा । अशी अवस्था बघुना जनाच्या मनिं पडल्या फिकरा, हरहर हे भगवान कशा तरी घरिं रहातिल ठिकरा ॥ गुंगहैबती म्हणे आज काय सरली पुण्याई, महादेव गुणी प्रभाकराच्या कवनीं चतुराई ॥जगदी०॥ ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP