परशुरामभाऊची कर्नाटकावरील स्वारी - पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
पटवर्धनकुळीं फत्ते तलवार परशुरामभाऊची । म्हणवून दिलीं वस्त्रें स्वारी नेमिली कर्नाटकाची ॥धुपद॥
तक्त दक्षिणेमधिं एक शहर पुणें अजब नमुना । बादशाही तक्तांत रावश्रीमंत आहे नाना ॥ नित्य हमेषा झडे चवघडा बाजे नौबत खनखना । बुद्धिवंत ते राव भले रणभूर रणीं हाटना ॥ श्रीमंतानें हुजुर जासुदा जोडी केली रवाना । तासगांवीं पोंचले भाऊसाहेब मुजरे घेना ॥(चाल)॥ लाखोटे टाकिले वाचूं लागले भले उमराव ॥ भाऊचें चौखंडामधिं नांव । ज्यानें निशाणीं घातळा घाव ॥ मिळाली स्वारी सोडाला गांव ॥(चाल)॥ तोफेचा भडिमार, मिळाळे लहान थोर । झाला त्या दिवशीं गजर ॥ झाला जयजयकार । श्रीमंतांशी भेटले सांगूं लागले गोष्ट जिवींची ॥ हुकूम रावसाहेबाला खोड मोडावी टिपूची ॥पटवर्धन०॥ ॥१॥
दिला भरजरी पोषाग निशाण चौघडा बक्षीस हत्ती । बावन पागा त्याचे बरोबर कशी मुजरा झडती ॥ राऊत गाडा शिपाई घोडा लढाई घेऊं म्हणती । छत्रपतीचा भगवा झेंडा वैरी दूर पळती ॥ जरीपटक्याशीं घेऊनि निघाले सेना गुण घेति । परशुराम अवतार भाऊला प्रसन्न गणपती ॥(चाल)॥ मुक्काम कृष्णातिरीं धारवाडावरी करा हल्ला ॥ भाऊसाहेबानें चढ दिल्ला । अवघड गड बाका किल्ला ॥ किल्ल्याचे भवतालीं अमराई गर्द बसली । झाडें किरमिची ठसलीं, त्याला दुरून फौज दिसली ॥ फत्तेबुरजावरून गोळा मरितो लढाई दोघांची । टक्कर खाऊन पेठ रगडली शर्यत भाऊची ॥पटवर्धन०॥ ॥२॥
धुमधडाका हमेष होतो किल्ल्या भवतालीं । तोफेच्या दणक्यानें राव कैकांचा घर सुटला । मेघश्शामभापूचा पुत्र भाऊअ निशाणीं चढला । उडी घातली रणांत रणशूर हाटून तटून पडला । धायगुडे थोरात पांढरे लगड होते बिनीला । सहा महिने झुलविले किल्लेदाराने मार बसविला ॥(चाल)॥ पुढे ऐका समस्त लोटली सेना दलभार । देवडीजंबुर्याचा मार ॥ किल्ला त्यांनी केला जर्जर । सुटती बाणावर बाण । कैकांचे घेतले प्राण । मुडद्यावर मुडदे चार, झाडी तोडून केलें मौदान ॥ त्यासमयीं झाली गर्दी दुसरी हल्ला किल्याची । गोळे मारून केले घाबरे जोत जरिपटक्याची ॥पटवर्धन०॥ ॥३॥
चवतर्फी केली हल्ला किल्लेदाराची शुद्ध हरली । फिरंग्याने तोफ डागिली फत्तेबुरजावरूनी ॥ तिळतिळ तुकडे उडू लागले मग घासत पडली । रणामधिं रणशूर ते कशी रंजक झडली ॥चाल)॥ लाखों सेनेमधिं कधिं सुरमर्द झांकेना । कृष्णराव बुद्धिवंत शहाणा ॥ मारी तलवार हटकून प्राणा । वाजल्या तोफा दणदणा ॥ करुणा ईश्वराला ॥चाल)॥ अवचित गोळा आला मस्तक छेदूनि गेला । धड पडले धरणीला पुत्रशोक करूनि गोष्ट ऐकिली सरदारांची । रणांत रणशूर थोर हिम्मत है राव दादाची ॥पटवर्धन०॥ ॥४॥
किल्य्याहून तोफा होतो भाडिमार । ह्या तोफखान्याची आहे इभ्रत फार ॥ एक गोळा नेऊन केला थंडगार । जोखून पाहिला पक्का बारा शेर ॥(चाल)॥ किल्लेदार सांपडला कैद केला भाऊनें । बसविले पेशव्यांचे ठाणें । हजार पांचशांचा बंद धरून । कापून काढले पार ॥ रक्ताचे वाहिले पुर । गेले तुंगभद्राचे पार ॥ पुढें भारी युद्ध होणार । नारो त्रिंबकाकडे रंगेल जोडी मौजेची ॥ खिनांत ज्यानें खोड मोडली सिद्याभवान्याची ॥पटवर्धन॥ ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP