मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
शिपाई थाट रोहिले जाट गांठ...

बदामीचा पोवाडा - शिपाई थाट रोहिले जाट गांठ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


शिपाई थाट रोहिले जाट गांठ न पडलि हैदर्‍याची । खबर ऐका बदामीची ॥ध्रुपद॥
नाना फडनवीस म्हणती भाऊला तुम्ही मोर्चाला खबरदार । गोळे सुटती तुटती तार ॥ रणमंडळ तोफेचें बळ कडक बिजली करिती मार । घाबरें होतें लष्कर ॥ किल्ल्यांत फिरंगी रोहिला जंगी, मारितो रंग केल्याचा । तळ्याकडे मोर्चा भोंसल्याचा ॥ आंत कानडा लोक फाकडा, शिपाई सडे तलवार । नेमिले चार हजार ॥ तळ्याच्या तिरीं भोंसला, शिरी श्रीमंत बिनीवर । मोंगलाचें लष्कर । बसूनियां हंबीर करिती विचार ‘हल्ला करा एकदाची’ । खबर ऐका बदामीची ॥१॥

किल्ल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानडयाचा । मुजरा पाहती किल्ल्याचा ॥ पाटणकर दंग, वाजे मृदंग, मांडला रंग, गोळा सुटला तोफेचा । ठाय उडविला नायकिणीचा ॥ किल्ल्यांत फिरंगी रोहिला जांगी मारितो रंग रकेल्याचा । तळ्याकडे मोर्चा भोंसल्याचा, किल्ला भेसूर शिंदे होळकर लष्कर दूर फौज त्यांची । तीन हजार सुटतो जंबूर, आग ना वरस, किल्ल्याची ॥खबर०॥ ॥२॥


पाठविली ॥ भाऊचे घोडे सड बेधड गारदी पुढें बिनी धरली । हरिपंताची फौज उठली ॥ धोशा मोगल, मुधोजी भोंसले, चिमणरायाची शाही हलली । घाडग्यानें कोर धरली ॥ तीन हजार सुटतो जंबूर आगना वरस किल्लाची । जाट रोहिले नीट तोफेची गांठ न पडली हैदर्‍याची ॥खबर०॥ ॥३॥

सडक सरदार भडकती, वीर भूमि भूमिकार गर्जिले । हस्ती तोंडावर दीधले ॥ भाऊसहित, दरवाज्यांत दारूचे बधले चेतले । सातशें शिपाई उडाले ॥ लोक भाऊचे परशुरामाचे मोठे नेमाचे झेंडे हालले । ह्योर जरीपटका चाले ॥ भोंसला भारी करुनि तयारी निशाण आलें अवचित । जरीपटक्यानें केली मात ॥ रण तुंबळ, घुमतें घायाळ, गणती नाहीं मुडद्यांची ॥खबर०॥ ॥४॥

शिपाई धडाधड झाले ठार, लढले दोन प्रहर हल्ला शिरला वाडयांत । भाऊसहित हरीपंत ॥ करा तलवार कापावें शहर मुलांमाणसांसहित । सातशें मुडदा गणित ॥ धरलें शहर, रोहिले नेऊनि घातले बंदांत । बातमी कळली किल्ल्यांत ॥ किल्ल्याचा धनी प्याला हिरकणी, आली बातमी, गोष्ट ही तिसरे प्रहराची ॥खबर०॥ ॥५॥

सुवाईमाधवराव धन्याचें नांव बाबीस उमराव तीन लाख लष्कर । घेतलें बदामी शहर ॥ गणित प्रहाराचें सवा प्रहाराचें रंजक झडली ती प्रहराची । लूट पैक्याची आणिक दिंडाची ॥ सरस बासन, वजनदार पाहुणे मेले बहुत फार । रणतुंबळ घुमतें घायाळ, तुडवणी झाली परगण्याची ॥खबर०॥ ॥६॥

गेले  किल्ल्यांत झाले यशवंत वर जरीपटका लाविला । कागद पुण्याला गेला ॥ धनी श्रीमंत बसुनी एकांत धन्यानीं कागद वाचिला । जखमा चौहजाराला ॥ नऊशें स्वार झाले ठार, ठाणें द्यावें रस्त्याला । आवाज तोफेचा केला ॥ राघुकवि दया असूं द्यावी, पोवाडा थोडासा केला । आमचें राहणें मुंगवडयाला ॥ आम्ही ह्मेमान पेठचे राहणार । आमची मिरास वाईची ॥खबर०॥ ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP