मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पानपतचा तिसरा पोवाडा - भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - सटवा रामा ( चाल - ‘दो दिवसांची तनु हे साची सुरतरसाची करूनि मजा । ) Translation - भाषांतर भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रदय फुटल कडाकडी । मुक्त पावले साहेब नाना कशा केल्या देवा तडातोडी ॥ध्रु०॥भाऊसाहेबाची अचळ बुद्ध, प्रसन्न त्याला भगवंत । अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित्त ॥ बारा सरदार बारा उमराव बसोनि करिती खलबत । घटका तिथी भट सांगतां बरवा आहे मुहूर्त ॥ बाईसाहेबाची आज्ञा घेतली जावे हिंदुस्थानांत । ओटयांत घातले विश्वासराव केला हवाला म्हणवीत ॥ अष्ट उमराव भाऊसाहेब घेऊन गेले पानपतावरत ।......॥ केला हकारा दिला नगारा स्फुरण आलें त्याच घडी । बुद्धीचे सागर सदोबा घालुनि गेले कशी उडी ॥ भाऊ नानाच० ॥१॥हत्ती घोडे लाबलष्कर ते एक एक होता हंबीर । त्यांचीं नांवें तुम्हां सांगतों ऐकुन घ्या जरा सत्वर ॥ धाकले नाना कुळाक्षरि त्याच्या मोहरलें फुलशहर । महिपतराव तेही पानसे तोफखान्याचे सरदार ॥ गोविंदराव बुंदेले अग्रीचा पुल्ला गेला होता रस्त्यावर । बळवंतराव रणशूर खासा पडला नजरेसमोर । विठ्ठल शिवदेव मर्द जातीचा क्षणभर नाहीं धरला धीर । त्याच्या मागें पळोन गेले अंताजी माणकेश्वर ॥ बाजी भिवराव अष्ट उमराव रणामधिं झाले चूर । दिल्लीमधिं तक्त स्थापलें ठेवले नारो शंकर ॥ असे एक एक ब्राह्मण कितेक लढाऊ लाज वाटती मज थोडी । अशुद्धाच महापुरे वाहती शिरें उडालीं झडाझडी ॥ भाऊ नानाच० ॥२॥पांडव दलचा जसा क्षत्रियवीर तारक अर्जुनाचा । इभ्रमखान व्याघ्र जातीचा सोबती झाला मरणाचा ॥ ज्यानें सूड घेतला हेतु पुरविला गिलचांचा । असला दुसरा चाकर होईना निमकहलाल भाऊसाहेबाचा ॥ वनीं राहिले विश्वासराव जीव गोपिकानानाचा । तिथें भाऊची शुद्ध हरपली सागर होता बुद्धीचा ॥ अवघ्या लोकांनी हिंमत टाकिली खांभ बुडाला दौलतीचा । सज्जन म्हणती भाऊ बुडाले मोठा घात झाला आमुचा ॥ दुर्जन म्हणती बरवें झालें कांच मिटला जगाचा । जे गिलचासंगें मळोन राहिले हरी ठाव पुसेल त्यांचा ॥ भाऊसंगे ब्राह्मण मेले नाहीं लागला अर्धघडी । काय तयाची कीर्त सांगावी? साहेब नाम धडाधडा ॥ भाऊ नानाच० ॥३॥होळकर भले झुंजार पळ काढिला लौकरी । जेव्हा गिलचाचा मार सुटला ठाव देईना त्याला धरत्री ॥ सोनजी भापकर मानाजी पायगुडे रणांत राहिल्या रणभेरी । मोठमोठे सरदार जवळ पडला जनकोजी शिंदा यशवंतराव धारकर ॥ राव दमाजी निघून चालले असे गळाले क्षत्री । समशेर - बहादर रणीं थकले कर्त्याची गत आहे न्यारी ॥ भाऊ नानाच० ॥४॥आम्हीं गाइलें पद सजना जिवा लागल्या झुरणी । भाऊसाहेबाच दुःख एकतां थरथर कांपे मेदिनी ॥ रामचंद्रांनी सीता टाकिली जशी येऊं दे भवानी । रडे गोपिकाबाई एकटी छत्र दिसेना नयनीं ॥ विश्वासराव भाऊ बुडाले पानपताचे मैदानीं । भाऊवांचून आम्हांला कोण नेईल पैलतिरीं ॥ श्रीमंत महाराज ह्याला प्रसन्न गौरासुरेपाणी । विश्वासराव भाऊ बुडाले पानपताचे मैदानीं ॥ सटवा राम नित्य हमेशा चरणीं वाजतो चौघडा । हाच पोवाडा ऐक शाहिरा नित्य होती घाडामोडा ॥ भाऊ नानाच० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP