मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
सति धन्यधन्य कलियुगीं अहि...

अहल्याबाई होळकरांचा पोवाडा - सति धन्यधन्य कलियुगीं अहि...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सति धन्यधन्य कलियुगीं अहिल्याबाई । गेली कीर्त करुनिया भुमंडळाचे ठायीं ॥ध्रुवपद॥
महाराज अहल्याबाई पुण्य प्राणी ॥ संपूर्ण स्त्रियांमधिं श्रेष्ठ रत्नखाणी ॥ दर्शनें मोठया दोषाची होईल ग्लानी ॥ झडतात रोग पायांचे पितां पाणी ॥ वर्णिति कीर्ति गातात संत ते गाणी ॥ झाली दैवदशें ती होळकराची राणी ॥(चाल)॥ उद्धार कुलाचा केला । पण आपला सिद्धीस नेला ॥ महेश्वरास जो कुणी गेला ॥(चाल)॥ राहिला तेथें जो जाऊन घेऊन बापभाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥

प्रत्यही द्यावी ब्राह्मणांस दशदाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने ॥ शोभती होमकुंडे द्विजवृन्दानें । टाकिती हजारो नेमाने अवदाने ।+++++++॥ चाल॥ कधीं कोटि लिंगें करवावी । वधुवरें कधी मिरवावी ॥ अर्भका दुधें पुरवावी ॥चाल॥ पर्वणी पाहुनि दान देते से गाई । जपमाळ अखंडित हातीं वर्णूं कांई ॥२॥

जेथें ज्योतिलिंगे जेथें तीर्थे महाक्षेत्रें । घातली तेथे नेहमी अन्नछत्रें । ज्यास आली जरा झालीं कांही विकळ गात्रें । पुरवावी त्यास औषधें वस्त्रे पात्रें । कितिकांनी घेतली स्मार्तअग्रिहोत्रें । दिली स्वास्थें करून त्या भटांस क्षणमात्रें ॥चाल॥ आधिं इच्छा भोजन द्यावें । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावें ॥चाल॥ जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रें ती रात्रिस गाई ॥३॥

यात्रेकर्‍याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास धोतर जोडे । कोणास दुशाला कोणास बटू घोडे । गवयास मिळावे सुवर्णकंठी तोडे ।+++++++। घाली गिर्‍याशाचे पायांत बेडया खोडे ॥चाल॥ बांधिले घाटमठ फार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनांत पाणी गार ॥चाल॥ त्यासाठी मुशाफर कायें धांवत जाई । विश्रांत पावती पाहून आमराई ॥४॥

किती ग्रहणसंधींत तिलतुला त्या केल्या ॥ कधीं कनक रौप्य आणि कधीं गुळाच्या भेल्या ॥ सांभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधि रामेश्वरीं गेल्या । संसारी असुन तिच्या वासना मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥ कवि गंगु हैबती म्हणती पुण्याची कोण करील गणती । राज्यास होती पडपण ती ॥चाल॥ महादेव गुणीचें लक्ष तिचे पाई ॥ कवनांत प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP