मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - ७

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


त्रेतायुगी शूर पाही । परशुराम विख्यात, कलिंत माधवरावसवाई ॥ध्रु॥
एकवीस वेळां धरती । फरशधरें अति पराक्रमें कुंभिनी केली निःक्षेत्री ॥ माघ शुभनक्षत्रीं । पुरंदरीं जन्मतां दक्षिणेमध्ये राज्य एकछत्री ॥ नाना प्रधान मंत्री ॥ श्रीमंत गर्भीं असता राज्य रक्षिले अराधुन यंत्री ॥(चाल)॥ किर्ती दिगंतरी मिरवे । जे महा दळ दक्षण उरवे ॥ करून पुंडाई वर्तती गर्वें । अजिंक शत्रु जिंकुनि सर्वे ॥ त्यांच्या मुखें वदविलें बर्वें । श्रीमंतांसन्मुख युद्ध न करवे । स्वकरें बुद्धी शस्त्र न धरवे ॥(चाल)॥ नाना ज्ञानगभस्ती आस्ता । करी स्वराज्य न्य़ून न दिसतां ॥ मुलखामध्ये चौथाई शिरस्ता । शहर पुण्याशीं येती रस्ती । जयजय धर्मराज इंद्रप्रस्ता । तैसे श्रीमंत तक्तीं बैसतां । सन्निध नाना दिपिच्या बस्ता ॥ मोंगलावर कंबरबस्ता ॥ युद्धीं गवस्ता काय अवस्था । तें कथन बुधश्रवणीं वरषतां ॥ वाटे प्रजेशी सौख्य समस्तां ॥ ऐकुनि हे व्यवस्थ सारी ॥(चाल)॥ आहारे आवघे भूप तयारी । पर्वतीस जाते जंव स्वारी ॥ गजपृष्ठीं आदर्शअंबारी । चोपदार ललकारी भारी ॥ हारोहारी रयत व्यापारी । सावकारी मुजरे होता मग मानत या साहेब दरबारीं ॥(चाल)॥ नानाची चतुराई धन्य तयाचें करणें दुसरी उपमा नाहीं ॥ त्रेतायुगीं० ॥१॥

अमृत वेळ सुमुहूर्तीं । गारपिरावर डेरे दिधले शत्रुशीं बांधून शर्ती ॥ रणीं पण केल्या अर्थीं । नानचें शौर्यतेज जे अर्जुन जैद्रथवधार्थी ॥ दळ तीन लक्षांची भरती । व्हावयास नानानीं धाडिलीं पत्रें देशावरती ॥(चाल)॥ कोण कोण सरदार ते न कळे । प्रळयकाळ शत्रुशीं तमले ॥ वैकुंठी यशाचे इमले । बांधुन मग सुरवंशीं जन्मले ॥ तें श्रवण करा कथनीं न कळलें । जरीपटक्याचे सवें नेमिले ॥ बाबा फडके हुजरातींतले । मानकरी शत्रुशीं तमले ॥ शिरिं समले लाउन निकराने ॥(चाल)॥ धायगुडे पाटणकर माने जाधव यादव रणाभिमानें ॥ घोरपडे केवढे मर्दाने । निंबाळकर पांढरे स्फुराणें ॥ ढमढेरे बरे सत्रानें ॥ उभे आपआपल्या बाजुनें ॥ हुजरातींतले नामाभिधानें । किंचित कथलीं यथामतीनें ॥ मध्यम पतकीं हिंदुस्थानें । विंचुरकर पवार धिरानें । उभे सडे फौजेंत भरानें ॥(चाल)॥ राजे बाहादर रंगराव होळकर स्वतां आदी उमराव । तयाचें जाहीर पृथ्वीवर नांव ॥ प्रतापि शिंदे दौलतराव । सैन्य समुदाय संमंधी ॥(चाल)॥ जिवबादादा ते रणफंदी । काबीज हिंदुस्थान सिबंदी ॥ करून आले दक्षिण संधी । मिरजवाले भोंसले सुबुद्धी ॥ आपा बलवंतराव निशांधी । ते परशुरामपंत प्रतिनिधी ॥ बजाबाबापू ते स्थीरबुद्धी । फिरंगाणी हापसाणी सिद्धी ॥ फराशीस आरबस्तानी सिंधी । चंदीचंदावर बुंदी ॥ कोटयाचे नृपाळ असंख्य सवें शूरांची मांदी । धनी माधवराव त्यामधीं ॥ प्रवर्तले मग मोंगल युद्धीं । राज्य अविंधी बुडउन होतां किंचित अवधि ॥ परागंदा शत्रुशीं करूं म्हणती । द्वादश कोस तळाची गणती ॥ महा महा मागिला युद्धांतीं । सैन्य न कळे तें पैवस्ती ॥ वडील वृद्ध आश्चर्य सांगती । धन्यधन्य नानाच्या युक्ती ॥(चाल)॥ असो शत्रुच्या पराजयालागीं वेळ होती । मजलोमजलीं चढाई करून चाललें सैन्य पुढें नेमुन सन्मुख लढाई ॥ त्रेतायुगी० ॥२॥

युद्धप्रसंगकाळीं । मोंगल दळरण युक्तीशीं सादर श्रीमंत सैन्य मुर्‍हाळी ॥ होतां रणखंडाळी । यंत्राचे भडिमार न दिसे धुम्रें सूर्य निराळीं ॥ मोखलितां शरजाळीं । भयाभीत गज अश्व शूर शत्रूसैन्य माळोमाळीं ॥(चाल)॥ येकच रणवाद्याची घाई । वीरश्रीची घुमराई ॥ अचळप्राय मत्तकुंजरशाई । चक्राकार उभे शूर पाई । दळ अशिलता धरून करा पाई ॥(चाल)॥ ठांई ठाई रथ शोभिवंत मग दाही दिशा चवताळती वारू । असी वादा असीवार तों ठाई ॥ थाट पुढें शत्रुचा देखोन हाट करुनीयां साठ तुरंगा । जाणउन मग गांठ घालिती । प्राणाशीं दुजायींच्या दाउन ऊर्ध्व वाट माघारे फिरती । दाट पराक्रम तुमचा साहेब अफाट कीर्ति ॥ वडलावडली भार असे जव पडती । चढती कळा धन्याची जाणुन वीर असे भीडती ॥ तेथें चढती मारुन अडती कैक नरमुंडे पडती । झडती घे यासीं येक येकाशीं उलटे ॥ किंवा काळच परसैन्यावर उलटे । पापभार शत्रु निवटले फुटल परदळ लुटलें ॥ अवघें विटलें ॥ मोंगल मल्ल युद्धासीं उठले ॥ मागें इतक्यांत यशस्वी । श्रीमंत वीर प्रगटले ॥ बळें लगटले । खटलेखोर तो मश्रुल‍मुलुख ॥ त्यास विगटले । घाबरलें दळ त्यांचें पळाया ॥ पुढें वीर सरले ॥ गांगरले परिवारासहित हरिले ॥ अवघे पराक्रम भुवनत्रयीं भरले । जें शत्रुचें मीपण हरलें ॥ कारागृहीं ठेवावें ठेवावें ठरलें । सब सैन्य जयवंतराव साहेबांचें फिरलें ॥(चाल)॥ विरलें जिकडे तिकडे सारें । बिनहत्यारें येती शरण तृषेचे मारें ॥ पाणी पाजुन प्राण वांचवा । म्हणती हे परभारें वार्ता ॥ ऐकुन कानीं श्रीमंतांनी । आज्ञा दिधली नाहीं मनाई ॥ कोणाशीं पाणी द्या सर्वांशीं । इकडे आज्ञा वकिलशीं ॥ चवथाई आणखी माहाल मुलुख पूर्वीचा होताअ तो मागुन घ्या त्याशीं । श्रीमंत आज्ञेने नबाबाशीं मग वकिल भेटले ॥ चवथाई मुलुखाचें निवेदन श्रुत केलें । मग वकिल आदरें गौरविले ॥ त्या करें त्वरें मग । तें कबुलायतपत्र दिधलें ॥ वाचितांच श्रीमंत हर्षयुक्त मनीं झाले । जय संपादुन शहर पुण्याशीं येउन आदरले ॥(चाल)॥ करून नगाची राई । जयवाद्यें वाजवीत परतली श्रीमंतांची शाई ॥ त्रेतायुगीं० ॥३॥

शृंगारून गजातें । आदर्श अंबारीतें ॥ करिती शूर मुजरे पिटून भुजातें । उभवुन यश ध्वजातें ॥ पुणें मार्गी लागलें हे एकुण श्रवणीं सौख्य प्रजातें । आनंदरूप द्विचांतें ॥ ठेवूनियां श्रीराम आले भेटायाला भरतानुजातें । स्नेहसद्‍गदीत नंदीग्रामीं ॥ तैसे श्रीमंत थेऊर मुक्कामीं । स्वामी देखुन स्वसेवका सुख अंतरयामीं ॥ व्योमींहून सुरपुष्पवृष्टि करितासी सकळिका । सरंजामी ते सरदार तैनामी ॥ स्वामी सन्निध शोभताती । अती सव्यवामीं ॥ कामीं पडले रनसंग्रामीं । मुहूर्त शुभ पाहुन स्वधामीं ॥ यावयास जमावले । ताकीद शहरांतील रस्ते झाडा ऐसें ऐकतां दूत धावले ॥ निर्मळ रस्ते करुन दुतर्फा दीप लावले । नगर लोक पटावयां धावले ॥ पाहुन मन विश्रांती पावलें । ते समयीं कोणाचे कसें जिवीं भासलें ॥ पूर्व तपश्चयेंचें फळ आज आनंदें बैसविलें - ॥ गादीवर साहेब. मग मुजरे करून सकळ शूरांनी । त्वरेंने निरोपावारे घेतले स्वनगरासीं जाया इच्छिलें ॥ येथुन मोगलयुद्ध संपलें । श्रेष्ठ भाग्य रायाचें केवढेम ॥ शके सोळाशें शहाण्णवांतील जन्म । धन्य तधींपासून या दिवसेंदिवस ॥ राज्याचीं चिन्हें दाखविलीं लिला । अद्धुत हे किर्ती गाजती ॥ सर करुनियां सर्व ही सृष्टी । शके सतराशें सत्तर राक्षसनाम संवत्सरीं ॥ शुक्कपक्ष अश्चिनी पौर्णिमा । ते दिवशीं सायंकाळीं मग संपविला अवतार आपला ॥ श्रीशांत सिद्ध कृपावरें । होनाजी बाळ करीं ॥
कवन रसिक जें जनांसीं प्रिय या ॥ श्रीमंत राज्यामधीं प्रजेला सुखअपार, ऋषी महान महान कल्लाण वांच्छिती । गादीचा अधिकार ज्याला, लक्ष (त्या) श्रीमंता पायीं ॥ लावुनी रामा अंदु निशिदिनीं रसिक कवनरस गाई ॥ त्रेतायुगीं० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP