मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| भाऊ नाना तलवार धरून । गेल... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पानपतचा पोवाडा - भाऊ नाना तलवार धरून । गेल... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - सगनभाऊ ( चाल - तुझी काळजी मला राजसा जासुद पिटवा इथुन ) Translation - भाषांतर भाऊ नाना तलवार धरून । गेले गिलच्यावर चढाई करून ॥ध्रुपद॥सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर पुणे वसविले मोहरा पुतळ्यांला नाही काहि उणे । चमके नंगी तलवार सैन्य हे सारे लष्कर पाहून ॥ गर्व कोंदला फार जैसा लंकापती रावण । होणारासारखे अक्षर कैसे लिहिले ब्रह्माने ॥( चाल )॥ नामांकित सरदार थोर । नामे ऐका तपशीलवार ॥ बोलावून अवघे वजीर । सजवृनया सभा सदर ॥ मग कैसा केला विचार । लिहिली एकच तार ॥ अष्टप्रधान पानकरी सार । जरीपटकाऐंशी हजार ॥ गाईकवाड सैनापती भार ॥ भाला ऐंशी हजार होळकर । बारा हजार बाणांची कतार । चाळीस हजार भोसले नागपुरकर ॥ वीस हजार अरब सुमार । तीस हजार हपशी बरोबर ॥ आले मल्हारराव होळकर । फौजेमध्ये कुल अकत्यार । अठरापगड लोक सार ॥ आपल्याला भिसलीवर ॥( चाल )॥ चाळीस हजार पठाण नित्य तेघे चमकती । अर्बुज जात ही खंदी फिरे भोवती ॥ सिंध जाट रोहिला नाही त्याला गणती । घोरपडे नाईक निंबाळकर नौबद वाजती ॥ घाटगे मोहिते माने पाटणकर झुकती । ढालेशी ढाल भिडे जरीपटक्याचे हत्ती ॥ हे मानकरी भाऊचे ऐसे दुनया बोलती ॥ एक एकाबरोबर ऐसै पतके किती । चाळीस हजार सडक करनाटकची चमकती । बाराभाई जमले नाही त्यांची गणती ॥ सांडणीस्वाराची डांक फिरेभोवती ।..........॥ अशी जमाबंदी करून । भाऊ नाना ॥१॥शाण्णव कुळीच भूपाळ सारे मानकरी बरोबर ॥ धायगुडे पायगुडे मोरे शेडगे पांढरे महाशूर ॥ खल्लाटे लोखंडे भिसे वाघमारे आणिक हटकर । शेळके बोळके काळे खचल खराडे नाही त्याला सुमार । शिरके महाडिक मिसाळ पिसाळ बोधे बरगे आहेत बरोबर । जाधव धुळप पोळ चवाण डफळे भोसले गुजर रणशूर ॥ लिगाडे कदम फडतारे घाडगे यादव थोरात भापकर । आंगरे इंगळे शेवाळे शितोळे रणदिवे वाबळे खळदकर ॥ गाढवे रसाळे जगताप जगदाळे काकडे काटकर । बोबडे ढुबल भोइटे लिंगाडे सांवत खिरसागर ( क्षीरसागर ) । गोडासे निकम दुधे फाळके धुमाळ गजरे वालकर तेरदाळकर । बागल कोकाटे कडमकर रणनवरे कालेवार आयरेकर ॥ हे सारे सुभे भाउचे उभे आपलाल्या बाजूवर ॥( चाल )॥ चाळीस हजार करवल जमले । सोडिले शिरावर समले ॥ रास्ते पटवर्धन नाही गमले । ढमढेरे तळेकर तुमले ॥ आले पंत जागा त्यांनी आखले । कितुरकर देसाई हाती भाले हैदराबादकर मोंगल आले ॥ मंत्री चिटणीस नरगुंदवाले । कोल्हटकर महारा? खटाववाले ॥ कुडुकवाल्यांनी खजिने पाठविले । गोवेकर फरास पुढे गेले ॥ लहान लहान मानकरी चुकले । थोर थोर जमेसी धरले ॥ नाना फौज पाहतांना चकले ॥ दलबादल डेरे दिधले । नगारखाने झाडू लागले ॥ गोसावी त्यामधि वायले । फक्क्ड ते सोटेवाले ॥ मग लाग्नण कितीक आले ॥ बावन पागा फारच झाले ॥( चाल )॥ कोतवाल घोडे सजविले श्यामकर्ण । भरगच्ची हत्तीवर झुला दिसे आरूण ॥ अयन्याची अंबारी गगनी तारांगण । आघाडी चालली लगी भडक निशाण ॥ सूत्रनाळी जंबुरे उंटावर रोखुन । खंडा ?? सुरे तिरकमान कटार लावून ॥ ढाल फिरंग नवाजखाणी निशंग गगन लकेरी खुन । पिस्तुल बंदुक चकमक चमके संगीन ॥ कराबीन बकमार याची खूण । राहिले एकदिल खूण करून ॥ जमराडे सरदार झांबरे शूर अतिरथी । लई धनगर शाण्णव कुळीचे मराठे होती ॥ ह्त्यार जमई जमदाड माडु घेऊन हाती । बिचवा लवंगी गुरगुज सांग सोटा बरची फेकिती ॥ सुरसेप दारूचे कैफ धुंद लढयेती । फसत बालमपेच खुबचार मारलई होती ॥ देणे महाराजांचे परिपूर्ण । चाले फौज काय पाहता दुरून ॥ भाऊ नाना. ॥२॥नाना भाऊंनी विचार केला फौजा पहाव्या म्हणून । स्वारी निघाली बाहेर दर्शना पर्वतीच्या कारण ॥ डंके झाले चहूंकडून घोडयावर ठोविले जीन । भले भले सरदार चालती आपआपल्या मिसलीन ॥ पेंढार पुढे तोफा चालल्या दारू गोळा बार भरून । हत्तीवर सूत्रनाळ उंटावर बाण भरूण ॥ बारा हजार उंट बाणांच्या कैच्या मागे चाले दबा धरून । कराबीन बक्कामार आरब सिंध रोहिले गोलचे गोल भरून ॥ करवलवाले एकांडे पन्नास हजार रहदारी करून । बासडीवाले धनगर निवडक बाजूवर ठरून ॥( चाल )॥ पुढे होळकर चालला । शिंदेशाई नाही ( येत ) गणतीला ॥ साडेसातशे कोतवाल सजविला । त्यांला भरगच्ची झुला ॥ सहा हजार तोफा बार भरला । पायदळ निशाण कडक पुढे उडाला ॥ चार हजार सोटेवाला । सात हजार बल्लमवाला ॥ गोलचा गोल नाईक आला । मागे फौज करनाटकवाला ॥ बावन पागा बारगीर जमला ॥ माय मोर्तब आले गणतीला । साठ मानकरी मोरचलवाला ॥( चाल )॥ रंगविले हत्ती पाखरा भरजरी जरा । अंबारी साडेसातशे मोती झालरा ॥ नाना भाऊंनी करून पोषाग चंदेरी तर्हा । गळा कंठी पाच शिरपेच मोत्यांचा तुरा ॥ कपाळी केशरी टिळा चंद्र दुसरा । हौद्यांत बसून शाहीचा घेत मुजरा ॥( चाल )॥ नऊ लाख सैन्य एकदिल घोडा शिरा । तीस हजार अबदागिरी बरोबर चाले ढिगारा । संगे झडती चौघडे शिंगे तुतारा ॥ पर्वतीचे दर्शन घेऊन येत माघारा । असा गवे चढून ॥ शहर पुण्यास मुजरा करून । भाऊ नाना. ॥३॥बाण बालम जिरीटोप बकतारे चाळीस हजार गणतीला । जामदारखाने फोडून पैसा सार्या सेनेशी वांटिला ॥ कडी तोडे पोषाग कंठया दिल्या झाडून फौजेला । शांत केली चित्तवृत्ती मग मनसुबा काढला ॥ हत्ती लढविले गिलचे पेशवे यश आले शत्रूला । राघोबादादा म्हणे भाऊशी प्रश्र पाहूं चांगला ॥ समस्तांनीं अर्जविले भाऊ ऐकेना कोणाला । दक्खनची सौभाग्य गळसरी तुटली त्या समयाला ॥ चाल केली गिलचावर डंके वाजवित चालला ॥( चाल )॥ धरिली दिल्लीची वात । अजिंठयाचा उतरला घाट ॥ बंडावे मोडल वाट । सातपुडयाची बारी दाट ॥ नऊ कोट मारवाडी नीट । त्यानें येऊन घेतली भेट ॥ दिल्ली जमाबंदी चट । बादशहाने आणविला जाट ॥ लखनोरचे नबाब जबघाट । दीडलाख फौजेचा थाट ॥ सेना जमली अटोकाट ॥( चाल )॥ नाना - भाऊंनी जाऊन यमुनेवर डेरा दिला । घारचे पवार जयपूर उदेपुरवाला । रातोरात पोंचली डाक सरंजामाला । भिडविले मोचें लढती किल्ल्याला ॥ किल्लेदार बडा रणशूर मार लाविला । बारा हजार तोफा सरबत्ती दिली तोफेला ॥ मोचें भिडती फौज लढती केली हल्ला । घेतला किल्ला जरबस्त बादशहा केला ॥ भाऊची खराबी गणीत नाही जखमेला ॥ भाऊ दिलगिर फार दिला हुकूम तोफेला ॥ दिल्लीत माईना मुडदा गंज पडला । दिल्ली शहर घेतले सर करून । भाऊ नाना. ॥४॥अटोकाट जमले पठाण कुंजपुर्यास साठ हजार । दोहिरी लाविल्या तोफा पुढे कोसाचा मार ॥ कुंजपुरा येईना हातीं भाऊअ जाहले मनीं दिलगिर । बोलावून पेंढारी मग त्यांनी काढला विचार । होळकराशी हुकूम झाला । बाण मग सोडी नागपूरकर ॥ फराशीस पुढे गेले गरनाळा । मरगोळ्यांचा मार । पेंढार्यांनी वेठ उठविला तोफखान्यासमोर ॥( चाल )॥ जागोजाग छबिने भाऊचे । राऊत पायदळाचे ॥ तट पाडिले किल्ल्याचे । फार सैन्य पडले भाऊचे ॥ चढलें निशाण शिंद्यांचे । नऊ हजार पेंढार भाल्याचे । लूट मुभा तुम्हा दिल्लीचे ॥( चाल )॥ जाटानें येऊन हुजूर अर्ज केला । “जुनी गादी तक्त बाच्छाई नये हात लावू तक्त्ताला ॥ जो लागेला पैका तुम्हा देतो खर्चाला । शिवाय फौज देतो तुमच्या कुमकेला ॥” नाहीं ऐकिले भाऊसाहेबांनी अपमान केला ॥ फोडिलें तक्त दिल्लीचें खजिना काढिला । लूट माफ होऊन दहा कोट खजिना धरला जमेला ॥ द्रव्यानें भरले छकडे बैलगाडयाला । लुटलें शहर सारे आग्र्यावर ढाला दिल्या । लखनोरचा नबाब रातोरात पळून गेला ॥ राजा रंजीस जाट रणभूर लाहोरवाला ॥ लिहून धाडिलें पत्र रुमशामाला ॥ “चवदाशें कोस घोडा अटकेस पाणी पाजला” । रातोरात डाक गेली गिलचाला ॥ आले वकील सलाम करून । भाऊ नाना. ॥५॥वकील उभे हात जोडून बोलती नानाभाऊकारण । लंब धाडली, तुम्हा खर्च झाला पैसा देईन ॥ पुण्यापर्यंत राज्य करावें दिल्ली अटकेपासून। क्रोध आला भाऊशी नऊ कोट रुपये द्यावे धाडून ॥ चवदाशे कोस आलों पुढें चवदाशें कोस जाईन । इस्तंबूल द्या किल्ला मुलुख रुमशामचा पाहीन ॥ दोन्ही हात बांधून शरण यावे तेव्हा परतून जाईन । गिलचा बोले कोणी आशा ठेविली आलें आम्हा मरण ॥ फेर पत्र पाठविलें दातीं धरून यावें तृण ।.....॥(चाल)॥ पत्र वाची त्या वेळेशीं । कळविलें अवघ्या फौजेशीं ॥ भाऊ बोले तेव्हा नानाशीं । दहा हजार फौज घ्या खाशी ॥ गोविंदराव बुंदेले बनशी ॥ दोन पतके बरोबर खाशी ॥ केला रवना फौजेसी । दाणा वैरण आणवायाशीं ॥ अग्र्यावर गेले त्या दिवशीं । खजिने भरले छकडयाशीं । रातोरात डाक गिलचाशीं ॥ आले चालून मग त्या पाशीं । कापिले दहा हजार फौजेशी ॥ शिर पाठविलें भाऊशीं ॥ भाऊ म्हणे कोणे एकाशीं ॥ असे नऊ लाख माझेपाशी ।.....॥(चाल)॥ गिलचाची फौज आली चालून भाऊवर । भाऊ हटेना लढणार तोही रणशूर ॥ केली रवाना फौजेसी । दणा वैरण आणवायाशीं ॥ अग्र्यावर गेले त्या दिवशीं । खजिने भरले छकडयाशीं । रातोरात डाक वैरण आणवायाशीं ॥ अग्र्यावर गेले त्या दिवशीं । खजिने भरले छकडयाशीं । रातोरात डाक गिलचाशी ॥ आले चालून मग त्यापाशीं । कापिले दहा हजार फौजेशी ॥ शिर पाठविलें भाऊशीं । भाऊ म्हणे कोणे एकाशीं ॥ असे नऊ लाख माझेपाशीं ।.....॥(चाल)॥ गिलचाची फौज आली चालून भाऊवर । भाऊ हटेना लढणार तोही रणशूर ॥ केली हातघाई दिवस पहिला सोमवार । अरबांनी केली गर्दी गोळी अपार ॥ गिलचाचे पडले मुडदे पळतां बेजार । धाडिलें पत्र रुमाला गलीस शिरजोर ॥ बडा खंडा बम्मन नऊ लाख फौज रणशूर । पानपतावर छावणी खंदक चौफेर ॥ आम्ही तरी मरून जाऊ हातीं घेतलें शिर । घाडा सडी फौज खाशी करून तय्यार ॥ चार द्स्ते घोडा पाठवा एकदिल सार ।....॥ धाडा खर्ची खजिना भरून । भाऊ नाना, ॥६॥बाच्छायानें पत्र वाचतां झाले मनीं दिलगीर । इस्तंबूल मागतां किल्ला चवथाई द्यावी कोठवर । भाऊक्षदोरी तुटली आम्हावर कोपला ईश्वर ॥ मरून खेरें होऊ परंतु ना जाऊं ह्याचे हार ॥ सांडणीस्वार फेंकिले कंधार पंजाब, पंचीन, बहाद्दर । वजीर बोलावून, विडे दिले; गिलचांस केलीं वस्तर ॥ फत्ते करा तलवार बक्षिसा देईन मुलुख महामूर । गादीचे नाव राखावे गलिमाला करावें जेर ॥(चाल)॥ चार दस्ते घोडा बोलाविला । दिला पोषाग पिंवळ्या शाला ॥ दुराण्या राऊत बोलाविला । बादशहाने शिरी हात ठेविला ॥ पुढें चालतां कडक उसळला ॥ हिरवें निशाण हिरव्या ढाला । फौजेचा ढग जसा वळला ॥ शहराबाहेर डेरा दिला ह्या दिवशी मुक्काम केला । बोलविलें अस्तरीला ॥ आम्ही जातो रणघराला । आतां आले रांडपण तुला ॥(चाल)॥ तोडुन गरसुळी फोडून हातची कांकण ॥ झाली निरवानिरवी शिरीं बाशिंग बांधून ॥ पैजेचे उचचिले विडे य़श घेइन । चारदस्त पडतील तेव्हां रूम सोडीन ॥ बादशहास बोलती कधी ना येऊ परतून । शंभर कोट रुपये खर्च दिला धाडून ॥ येईन किंवा जाईन मरून । भाऊ नाना. ॥७॥शंभराची कुंपीन अकराशांचे एक पलटण । अकरा पलटणांचा कंपु अकरा कंपूंचे एक दस्तन ॥ अशीं दोन दस्त ठेविलीं रुमाच्या गादीला राखण । चारदस्त सरंजाम नदी सत्रंजी आले उतरून ॥ पिंवळे करून पोषाक नवरे तळहातात शिर घेऊन । धाडिले वकील गिलचांनी मसुदे बोलाया कारणें ॥ नाहीं ठरलें बोलणें भाऊसाहेबाशीं गर्व दारुण । वकील आले माघारे वृत्तांत कळविला जाऊन ॥(चाल)॥ गिलचांनी कावा केला । तीन कोस सोडून भाऊला ॥ भंवता वेढा घातला । रस्ता चालूं देईना झाला ॥ वाणी उदमी बंद केला । पुढें धारण आली फौजेला ॥ दीडकोळवें दाणे रुपयाला । खरा खोटा घ्या दाखला ॥ मीठ मिरचीचा तोटा पडला । निजींव अंतकाळ झाला ॥(चाल)॥ नानाभाऊनी बसून डेर्यांत करिती विचार ॥ अन्न दृष्टि पडेना झालें आम्हा खोबरें ॥ पाण्याची किंमत रुपयास झालें शेर । निमें अन्न निमी शाडू भक्षिती सार ॥ पोटाचे महादुःख सोसेना तिळभर । पोटावीण ओढून काचा बांधी कंबर ॥ म्हणे भांग तमाखूअ अफीम राहिली दूर । भाऊशी बोलती मिळून अवघे लष्कर ॥ नेऊन घाला गिलचांवर झालों निष्ठुर । हत्ती घोडे उंट मरती ठाणावर ॥ कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना०॥८॥गिलचांनी हिकमत करून भाऊ वेढिला बहुत युक्तीनें । जठराग्री चेतला खवळला व्याघ्र पंचानन ॥ झांगड नौबत वाजती दणादण भेर बाजे संगीन । डंके झाले चौघडे घोडयावर - जीनसामान ठेउन ॥ फौज झाल्या तयार निष्ठुर करवलाचे मैदान (ना)। चोरडाक होती गिलचांची नाहीं कळलें संधान ॥ भाऊस बातमी कळली जरीपटका गेला चालून ॥(चाल)॥ गिलजांनी रणखांब पुजिला । भाऊशी वर्तमान कळला ॥ काय पाहतां गलीम सांपडला । एकदांच हर हर केला ॥ रोखिले आघाडी जेजाला । कडाबीन सुत्रनाला ॥ ऐशीं हजार होळकर भाला । शिंद्यांनी मार खूप दिला ॥ बाण सुटती तीर कमानीला । अरब हपशी तो रोहिला ॥ गोसावी धुंदकत चालला । करवलाने घोडा चमकाविला ॥ भाऊसाहेब अंबारीत दुल्ला । दादू महाताने हत्ती पुढे नेला ॥ तीरकमान हत्ती धरला । पांडवदळी भीमसेन आला ॥ की पार्थवीर खवळिला । दिली सरबत्ती तोफेला । नऊ हजार गोळा उडाला ॥(चाल)॥ तासे मर्फे ते ते तंबूर किती वाजती । कर्णे कितीएक रणबहिरी कर्कती ॥ गिलचांच्या तोफा कुलपी गोळे गर्जती । ध्रुकोट बाण जशी ढगात वीज चमकती ॥ दणादण मेरूमांदारधरणी कापती । आडू माडू शिपाई व्याघ्र उढाण साठती ॥ वीरास वीर तरकून पुढे सरकती । झाली हमका शत्रुला विरास विर घुमती ॥ केली खनाजंगी स्वारस स्वार धडकती । बारा हजार पालखी भाऊची झाली रिती ॥ तीन लाख घोडा गर्द जरीपटक्याचा हत्ती । ऐशी हजार होळकर गुप्त नाही दिसती ॥ पायदळाचे गोळे जागोजान पडले किती । सोडला कंठ मग पाणी पाणी होळकर गुप्त नाही दिसती ॥ पायदळाचे गोळे जागोजाग पडले किती ॥ सोकला कंठ मग पाणी पाणी बोलती ॥ जखमांची नाही गणती कबंध नाचती । झांकोळले गगन सूर्य गेला भिऊन । भाऊ नाना० ॥९॥झाकोळला सूर्य गगनीचा मग पडला अंधकार । गलिमाने पुरविली पाठ भाऊ हटेना तो रणशूर ॥ पानपतावर सुरू लढाई भाऊ अंबारीत कमान तीर । बाण बंदुकीचे फैर झडती तोफेचे गोळे पडे जसे गार ॥ गोळ्यासरसा भाऊ उडाला दादू महात चकाचूर । बापासी लेक वळखेना धरणीमाय जागा देईना क्षणभर ॥ नानासाहेबाशी डाक आली ते गेले हामी सादर । झाले घोडयावर स्वार बाईस कळले धरला पदर ॥ बोले गोपिकाबाई पुण्याचे राज्य कोण करणार । भाऊसाहेब गेले आम्ही तरी काय राहून करणार ॥ ब्रह्यणीराज्य पेशवाई बुडाली असे नाही होणार ।..........॥(चाल)॥ पैजेचा विडा उचलला ॥ सारी शाही पाहती नानाला ॥ ढाला पट्टा सुरई दाबला । दोन लाख घोडा बरोबरीला ॥ रणामध्ये येऊन शिरला । झाली चकमक एकच हला ॥ चाळीस हजार जिरेटोपवाला । नानापाशी कत्तल झाला । होळकराने फितवा केला । हे ठाऊक नाही नानाला ॥ वैर्यांनी वैर ह्पशीपत्रे रोहिला । तो घारीवाणी उडाला ॥ घोडयाहून खाली आला । लढण्याचा हेत नाही पुरला ॥ नाना पडला धर मग सुटला । गिलचाने मार खूप केला ॥(चाल)॥ खंडकांत माईना लोक उंट घोडे सारे । गिलचांचा एक द्स्त यश रणशूर ॥ नऊ लाखातले सातशे उरले सारे । तोफा बंदुका पडल्या सुने दिसती डेरे ॥ मोहरा पुतळ्या रुपयांचे जागोजाग पडले ढिगारे । पडलेल्या फौजेचे मागे कोण घेणार ॥ हत्ती उंट मोकळे घोडयांचे खिल्लार । कोणी लूट घेईना पळता जीव बेजार ॥ गेले दाही दिशांवर पळून । भाऊ नाना० ॥१०॥शके सोळाशे पांसष्ट फाल्गुन वद्य षष्ठी आदितवार ॥ नऊ रात्र नऊ दिवस लढाई मग फिरले माघार ॥ सातशांनी धरली वाट पुण्याची निर्माल्य लष्कर । खेडया - खेडयाचे पाटिल लुटती महार चांभार । बेदड घालिती छापे वाट चालेना तिळभर ॥ पुढे बिकट बारी कैसा तारील परमेश्वर । असे सांडाव देत आले अटक अटक उतरून नऊ कोशांवर ॥(चाल)॥ तिथून अवघे फुटले पुण्याचे रस्ते भुलले ॥ फारदिसा भुलीमधे गुंगले ॥ नऊखंड फिरता चकले । अन्नाविण वाळून सुकले ॥ भक्षिती झाडांचे पाले । गोसावी कितीएक झाले ॥ तुंब हाती घेतले । किती रामेश्वराकडे झुकले ॥ काशीचे रस्ते धरले । या रितीनें सैन्य खपलें ॥ दैवाचे पुण्याशीं आले । लाखोटे सदरेवर पडाले ॥ दुःखांचे सागर फुटले ।........॥(चाल)॥ लाखोटे वाचिता झाले अवघे घाबर । नानाभाऊ बुडाले पुण्यास आली खबर ॥ नानाभाऊ बुडाले परंतु लौकिक दुनयावर । नवलाख बांगदी फुटली असा हाहाकार ॥ दक्षिण बुडाली सती पडल्या महामूर । श्रीमंताच्या तक्तापाशी भले भले मनसुबीदार ॥ स्थापिले गादीवर माधवराव नेणार । सोन्याची जळली भट्टी उरले खापर ॥ शाहू छत्रपतीचे देणे सांब अवतार । गातो सगनभाऊ ठिकाणा शाहुनगर ॥ गातो फत्तेजंग पोवाडा करून । भाऊ नाना०॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP