Dictionaries | References

वळण

   
Script: Devanagari

वळण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  न्हंयचें मोडण   Ex. खूब मुखार ही न्हंय वळणाचेर खूब रुंद आसा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kasدٔریاوُک موڑ , دٔریابُک موڑ
urdبانک , وَنکر , وَنک
   see : मोडण

वळण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 6 training, disciplining, managing. Ex. बाळकास वळणांत ठेवावें. 7 A mound or bank raised to turn the course of a stream. Pr. पाण्याअधीं वळण बांधावें. वळणावर जाणें g. of o. To take after; to form one's self upon; to follow. वळणावळणानें नाव हाकणें -काम करून घेणें -जाणें -चालणें -वागणें &c. To conform to all the turnings and windings of.

वळण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n f  Outlines. A turning. fashion. intercourse. disposition. training.
वळणावर जाणें   take after; follow.

वळण

 ना.  तर्‍हा , मोड , शैली ( अक्षर , चित्ररेषा );
 ना.  पद्धती , रीत , व्यवहार , शिक्षण , संस्कार ( वागण्याचे );
 ना.  बांक , मोड , वाकण ,

वळण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण   Ex. पुढल्या वळणाजवळ शाळा आहे
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखादे कार्य, घटना इत्यादीची जिथून दिशा बदलते असे स्थान   Ex. येथून कथेने एक नवीन वळण घेतले.
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  वागण्याची रीत   Ex. आईने त्याला चांगले वळण लावले.
 noun  रस्त्याचा घुमाव किंवा वळण   Ex. ह्या रस्त्यात खूप वळणे लागतील.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली   Ex. हे राजस्थानी वळण सुंदर आहे.
ONTOLOGY:
()कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखादी वस्तू जेथे वळते ते ठिकाण   Ex. तारेच्या वळणावर एक पाल आहे.
HYPONYMY:
वळण
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  वळण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव   Ex. ह्या रस्त्यावर खूप वळणे आहेत.
HYPONYMY:
वळण
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوَر
mniꯊꯦꯀꯣꯏ ꯅꯥꯀꯣꯏ
urdگھماو , گھماوپھراو
 noun  नदीचे वळण   Ex. खूप पुढे गेल्यावर ही नदी वळणावर खूप रूंद आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasدٔریاوُک موڑ , دٔریابُک موڑ
urdبانک , وَنکر , وَنک

वळण

 वि.  ( गो . ) अर्धे जळलेले . वळणुचे - क्रि . ( गो . ) अर्धेमुर्धे जळणे . [ सं . ज्वलन - वळणे ]
  स्त्री. ( व . ) वळचण पहा .
  न. 
   आकारभेदाचे प्रकार ( अक्षर , चित्र , शरीर , अवयव इ० चे प्रत्येकी ); तर्‍हा ; मोड . गोंदूनानाच्या अक्षराचे वळण बिवलकरी दिसते .
   वागण्याची रीत , पद्धति , व्यवहार .
   कल , प्रवृत्ति ; झोंक ( अंतःकरण , मन इ० चा ).
   शिक्षण ; शिस्त ; व्यवस्था . बाळकास वळणांत ठेवावे .
   देणे , घेणे , जाणे , येणे इ० व्यवहारत्यामुळे येणारा संबंध ; दळणवळण . सरकारांत वळण बांधावे , मग फिर्याद करावी .
   वक्रता ; सरळपणा नसणे ; वांक , ( नदी , रस्ता , काठी इ० चा ).
   डोंगराचे वांकण
   नद्यादिकांचे पाणी विवक्षितजागी न्यावयासाठी बांधतात ते धरण ; बांध ; माती दगड वगैरेचा वळ . उदधीचे वळण फुटे । - उषा ९९ . २३ .
   वशिला ; वजन . ( क्रि० बांधणे ). चिंतोपंतांनी रामशेटजीकडे वळण बांधून नोकरी मिळविली .
   वेढा ; वळसा . दुर्मोच्य काळपाशासम याच्या होय वळण वळयाचे । - मोवन ६ . २० . [ सं . वलन ] म्ह०
   वळणाचे पाणी वळनानेच जाईल .
   पाण्याआधी वळण बांधावे . ( वाप्र . ) वळण बांधणे - ( ल . ) मैत्री संपादन करणे ; संधान बांधणे . वळणावर जाणे - अनुसरणे ; प्रमाणे चालणे , वागणे . हा अगदी बापाच्या वळणावर गेला . सामाशब्द -
०डळण   दळण न . दळणवळण पहा .
०दार वि.  
   चांगला आकार , वळण असलेले ; नीटनेटके . एकसारखे , व्यवस्थित , शुद्ध ( लेखन ). घटींव घोंतीव यांपासून हे निराळे आहे .
०शुद्ध   सूद वि . प्रमाणशीर ; वळणदार . ती कामाच्या सोईकरितां अथवा वळसूदपणाकरितां सुधारण्यांत आली . - इंमू ३५२ . वळणी स्त्री . वळणे , वळण पहा . वळणी , वळणीस आणणे येणे वठणीस आणणे - येणे पहा . तव विक्रमाविणे पळभरिहि न येतींच खळ बळे वळणी । - मोनामरसायन . वळणे उक्रि .
   दिशा बदलणे ; फिरविणे .
   राखणे ; सांभाळणे ( गुरे , मेंढ्या इ० ). चला वळूं गाईबैसो जेऊं एके ठायी । - तुगा २०० .
   बनविणे ; घडविणे ( पिळून , इतर क्रिया करुन ). संस्कृत इक्षुदंडरस अपार । त्याची प्राकृत हे वळिली साखर । - ह १९ . २२२ .
   अंकित करणे ; वश करणे . मातल्या कामभद्रजाती । विवेकांकुशे वळावा । - मुआदि १६ . ११ .
   वळवून , परतवून नेणे , आणणे . जन कथिति धेनु कुरुनी वळिल्या येऊनि उत्तरशेला । - मोविराट ६ . ६३ . वळल्या हातीवरल्या ढाला । - ऐपो २१ .
   वळता करणे , घेणे . - अक्रि .
   घटले जाणे ; चांगले तयार होणे ( अक्षर ).
   वळणदार होणे ; योग्य रुप घेणे . ( चित्र , प्रतिमा इ० नी ).
   वांकणे ; कलणे ; दिशा , रुप , आकार इ० बदलणे . - ज्ञा ११ . ४८७ . मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल . आकाशी मेघ करी गर्जना । वळला पर्जन्य सभोंवता
   शरीरावय वायूने आंत ओढला जाणे , त्याला वेदना होणे ; पेटका येणे ; वांव येणे .
   अनुकूल , वश होणे ; कबूल होणे . वळला न ईश्वरासहि तो दुष्ट वळेल काय इतरांला । - मोउद्योग १० . ७१ .
   प्रसन्न होणे . म्हणे सोसिका नृपा ! वळलो । - मोअश्व १ . ३५ .
   फिरणे ; विशिष्ट दिशेने जाणे . [ सं . वलन ] वळता देणे - परत देणे , करणे ( पैसा , उसनी वस्तु ). वळती - स्त्री .
   रानामध्ये गेलेली गुरे परत वळवून आणण्याचा व्यापार .
   गुरे वळून आणण्याची पाळी ( गुराखी पोरे खेळत असतां ज्यावर डाव येतो त्याने गुरे वळावी असा संकेत ). वांसुरे चारितां गोविंदा । वळत्या न देसी तूं कदा । - ह ३६ . ५६ ; - तुगा १७० .
   एकदम , एकाएकी आगमन , फेरी . ( क्रि० येणे ). दूध उघडे टाकूं नको मांजराची जर कोण्हीकडून वळती आली तर खाऊन जाईल .
   उलट चाल , जाण्याचा रोंख , वळण ; फेरी . गुरे गांवाकडे येत होती आतां वळती रानाकडे चालली .
   ( जुगार ) विशिष्ट दान पडले असतां घेण्यासाठी मांडलेले द्रव्य .
   छपराचा सुरवातीचा , तळचा भाग . ( क्रि० बांधणे ).
   हल्ला चाल . ( क्रि० करणे ). मौजे मजकुरावरि डफळेची फौज येऊन वळती केली ते समयी युद्ध जाहले . - वाडशाछ १०७ . वळतीस येणे - वळणीस , वठणीस येणे . त्यांनी धनीण बहु दक्ष असे म्हणावे । घेवोनि धाक हृदयी वळतीस यावे । - अर्वाचीन ३८२ . वळते करणे - वजा करणे . वळवणी - स्त्री . एक हत्यार ; पकड . वळविणे - उक्रि . ( वळणे प्रयोजक ).
   आकार देणे ; घडविणे .
   फिरविणे ; कलते करणे ( केंस इ० ).
   गिरविणे ; घटवणे ; वळण देणे ( कित्ता , खरडा , हस्तव्यवसाय इ० ला ).
   तयार करणे ( पिळून , विणून ). वळाण - - न . ( प्र . ) वळण पहा . वळित , वळीत - स्त्री .
   सुरकुती . लपौनि चोर खांचेचा वोहळी । वळीतपळिताचे ताडवन घाली । - भाए ५२१ .
   वळती ; परत फिरणे . ( क्रि० धरणे ). आतां मोडूनि ठेली दुर्गे । कां वळित धरिले खगे । - ज्ञा १३ . ५८३ .
   वळती पहा .
   मेलेले माणूस भूत होऊन घरी परत येणे . वळींव - वि .
   वळलेले ; पीळ दिलेले ; विणलेले .
   घट्ट पिळलेले , वळलेले ; पिळदार .
   भक्कम ; चांगले मजबूत ; घटलेले ( शरीर इ० ) वळीव गवरी - स्त्री . गोळा बनविलेले शेण ; गोल गवरी ; थापा - थापटी नव्हे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP