|
पु. १ कडा ; बाजू ; मर्यादा ; टॉक ; किनारी ( ताट , पागोटें , मडकें इ . च्या भोंवतालचा भाग ); कोर ( भांडी वगैरेची ); कांगोरा . २ किनारा ( समुद्राचा ); जवळची भूमि ; थड - डी ( समुद्र , नदी यांची ). ३ पदर ; किनारी ( वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी ). ( सं . कंठ = गळा , काष्ठा = सीमा ) ०कोणा सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें . मोजणें सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें . ०किनारा पु. बाजूची पट्टी - कडा - कांठ . ( काट + किनारा ) ०कोपरा पु. बाजू , कड , कोपरा , कोन . ' सारे शेत पिकलें ( गेलें ) नाहीं कांठकोपरा पिकला ( गेला ). ०दोरा पु. कापडाच्या गांठीच्या - काठाला घातलेला जाड दोरा , पदराला घातलेलीं दोर्याची शिवण . '( ठा ) परा - प्रा - फरा - पु . १ ( कों ) फुटलेला मातीच्या मडक्याचा वरचा भाग ; अर्धा भाग गळा ; कांठ . ' काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठकरा गळां वहात । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचारी । ' - एभा १३ . २०६ . ' जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरलें निजआळां । ' - एरुस्व १८ . ४५ . ५ बोडकें गलबल ( शीड , काठी वगैरे कांही नसलेलें ). गलबताचा सांगाडा ; खटारा . ०फुटका वि. ज्याचा कांठ मोडला आहे असा . ०मोडका मोडा - कांठफुटका पहा . ०मोरा १ कांठप्रा पहा . ' जेवीं नीचाचा कांठमोरा । गळां अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रं विटाळी । - एभा २६ . २०६ . ' कांठमोरा त्याचे निडळी रुतला । ' - पंच ४ . ४ . ' हातां न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडण करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां कांठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी । ' - ह . ७ . १४६ . २ पोळी , भाकरीचा कडेचा तुकडा . ( क्रि०घेणें ; तोडणें ). कांठमोरा गळ्यांत अडकणें - येणें - एखाद्या धंद्यातील कामांतील लभ्यांश हातीं न लागतां व्यर्थ शीण पडणें ( ज्याला मडक्यांतील वस्तु खावयास मिळाली नाही पण मडक्याचा कांठे गळ्यांत अडकला त्या कुत्राप्रमाणें ). ०रें न. कापडाची किनारी ; धार . ' धोतराची कांठरी लोंबू लागली .' ०वा - पु . ( ना .) कांठ ; किनारा ; थडी . ०सर तुडुंब कांठोकाठ ; ओतप्रोत .
|