Dictionaries | References

मोडा

   
Script: Devanagari

मोडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
chair.

मोडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Prevention; prevented state; a break.

मोडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू   Ex. खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पायदान
Wordnet:
hinपावदान
kasپایہٕ دان , فُٹ رٮ۪سٹہٕ
kokबांकीन
tamபாதபீடம்
urdپاؤں دان , پائےدان

मोडा     

 पु. 
हरकत ; विघ्न ; अडथळा ; नको म्हणणें ; नकार देणें ; मनाई करणें ; कांहीं एक कार्य होऊं न देण्याविषयीं केलेला प्रतिबंधक व्यापार .
अशा व्यापारानें कार्याची झालेली कुंठितावस्था ; खोळंबा ; हरकत केलेली , मोडता घातलेली स्थिति . पर्जन्यानें चार दिवस आंवजेचा मोडा केला .
पाठ नसलेली खुर्ची ; घोडी .
गुरांचा व शेतकामाचा सुटीचा दिवस .
( मल्लविद्या ) आपल्या मानेवर जोडीदारानें हात ठेविला असतां आपल्या बाहेरच्या हातानें मानेवर ठेविलेल्या जोडीदाराच्या हाताचा पंजा धरुन तो मुरगळून जोडीदारास चीत करणें .
घडवंची . [ मोडणें ] मोडा , मोडता घालणें - क्रि . अडथळा करणें ; विघ्न आणणें ; हरकत येणें . भोपाळावर स्वारी करण्याच्या राघोजीच्या बेताला इंग्लिशांनीं मोडता घातला . - विवि ८ . ७ . १३९ .
०कुंद  पु. एक प्रकारचा रोग ; आळस .
०खा  पु. ( कु . ) जेथून दोन रस्ते फुटतात तें स्थळ .
०वणी  स्त्री. गळाठून जाणें ; हतबल होणें ; कमजोर होणें ; अग मोडून येणें ; कसकंसणें . [ मोडावणें ] मोडावणें अक्रि . थकणें ; दमणें ; मोडकळीस येणें ; कोसळणें ; श्रम , दुखणें यांमुळें ग्लानि येणें . मोडावला जाणो निकुंभ । उठावला वज्रनाभ । मग पाठीसि घातला सांब । मदन वीरे । - कथा १ . १३ . ६३ .
देहस्मृति नाहींशी होणें . राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । - ज्ञा १८ . १६१३ .
वाढ खुंटणें किंवा थांबणें . [ मोडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP