|
पु. १ गळा ( हनुवटीच्या खालील व खांद्याच्या वरील शरीराचा भाग ). ' कंठी झळके माळ मुक्ताफळांची ' - गणपतीची आरती . २ ( गायन ) गळ्यांतून निघणारा ध्वनि ; आवाजी . ' स्वरावरुनि समजे कंठ .' तिचा कंठ फार मधुर आहे . ' ३ ( पोपट . कबूतर . चिमणा इ० ) पक्ष्यांतील नराला तारूण्यावस्था प्राप्त झाली असतां गळ्याभोंवतीं जी एक काळी रेषा उमटते ती . ( क्रि . फुटणें ). ४ भांडें वगैरेंच्या तोंडाखालचा आवळ भाग ; कांठ . ५ श्वासनलिकेचें वरचें तोंड , मणका ; नरडें ; घसा . ' दुःखामुळें कंठातून शब्द निघेना . ' ( सं .) ०दाटणें भरुन येणें सदगदित होणें - दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्यानें घसा दाटणें त्यामुळें तोंडांतुन शब्द न निघणें ; आवेग येणें ; सद्गदित होणें ' दासाकडे हनुमंत पाहे । तों गहिंवरें कंठ दाठलाहे । ' - संवि २ . ८५ . ' सांगू जातां मुखानें । तो कंठ आला भरून । ' - नव २२ . ४५ . ०फुटणें ( गायन ) १ चिरका आवाज होणें . ' फार उंच स्वरांत म्हणुं नकोस . कंठ फुटला तर पंचाईत होईल .' २ कंठ ( अर्थ ३ ) येणें ( पोपट , इ० पक्ष्याला ). ३ खणखणीत शब्द निघणें . ' त्याला नुकताच कंठ फुटला आहे .' ४ वयांत येणें ; प्रौढदशा प्राप्त होणें . ०बसणें घसा वसणें ; आवाज ( गाण्यांत , भाषणांत ) स्पष्ट न निघणें . ' उष्णकाळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक जहालें बहुतां । म्हणती कंठ बैसले आतां । नये गातां कीर्तनीं ॥ ' - संवि २२ . १२२ . ०मोकळा रडणें - मोठ्यानें रडणें ; मनमुराद रडणें ; ओक्साबोक्शी रडणें ; भोकाड पसरणें . ' मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा । '. -( वामन ) भरतभाव १४ . कंठास - कंठी - प्राण येणें - १ . ( भीतीनें , दुःखानें ) अर्धमेलें होणें .' प्रतिवचनप्रसंगी प्राण कंठास आला । ' - सारुह २ . १०३ . २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें . कंठास लावणें - मिठी मारणें ; आलिंगन देणे . ' कंठास त्यास लावून । ' - संग्राम १५ . कंठी प्राण उरणें - आसन्नमरण होणें ; धुगधुगी राहणें . ' त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे . ' कंठी प्राण ठेवणें , धरणे - राहणें - एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें . ' अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिलें त्यांनीं । ' - संवि २० . ७७ - हृ २१ . ७२ . ' तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ॥ ' - रत्न ४ . ३ . ' मुलगा येईपर्यंत म्हातार्यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता . ' कंठीं धारण करणें - १ गळ्यांत घालणें ( माळ , अलंकार , इ० ). २ जपणें ; स्मरण करणें . ३ अति प्रिय असणें . करुन रडणें - मोठ्यानें रडणें ; मनमुराद रडणें ; ओक्साबोक्शी रडणें ; भोकाड पसरणें . ' मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा । '. -( वामन ) भरतभाव १४ . कंठास - कंठी - प्राण येणें - १ . ( भीतीनें , दुःखानें ) अर्धमेलें होणें .' प्रतिवचनप्रसंगी प्राण कंठास आला । ' - सारुह २ . १०३ . २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें . कंठास लावणें - मिठी मारणें ; आलिंगन देणे . ' कंठास त्यास लावून । ' - संग्राम १५ . कंठी प्राण उरणें - आसन्नमरण होणें ; धुगधुगी राहणें . ' त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे . ' कंठी प्राण ठेवणें , धरणे - राहणें - एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें . ' अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिलें त्यांनीं । ' - संवि २० . ७७ - हृ २१ . ७२ . ' तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ॥ ' - रत्न ४ . ३ . ' मुलगा येईपर्यंत म्हातार्यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता . ' कंठीं धारण करणें - १ गळ्यांत घालणें ( माळ , अलंकार , इ० ). २ जपणें ; स्मरण करणें . ३ अति प्रिय असणें . ०कार्कश्य न. कर्कश आवाज ; आवाजाचा कर्कशपणा . ०कोकिला ळी - स्री . ( ल .) सुकुमार , मधुर आवाजाची स्त्री ; पिककंठी . ( सं .) ०गत वि. १ गळ्यातील ( दागिना , वस्तु इ० ). २ नेहमीं तोंडपाठ असलेला ( अभ्यास , वचन इ० ); मुखोद्गत . ३ गळ्यांशी आलेला . ( सं ,) ०गत - वि . १ धुगधुगी असलेला ; ज्याचा प्राण गळ्यांशीं आला आहे असा . ०चामीकार पु. गळ्यांत सोन्याचा दागिना असून तो हरवला अशा समजुतीनें घरबर हिंडणें , समानार्थक ; - काखेंत कळसा गांवाला वळसा ; गौडीखालीं आरी , चांभार पोर मारी . न्याय पु. गळ्यांत सोन्याचा दागिना असून तो हरवला अशा समजुतीनें घरबर हिंडणें , समानार्थक ; - काखेंत कळसा गांवाला वळसा ; गौडीखालीं आरी , चांभार पोर मारी . ०नाळ न. गळ्यांची नळी ; मान ' मग कंठनाळ आटे । ' - ज्ञा . ६ . २०७ . ' तदा कंठनाळांतुनी शब्द झाला ' - गणपतिजन्म . ( सं .) ०नाळनिरणे गळा कापणें ; ठार करणें , ०पाठ वि. तोंडपाठ मुखोद्गत . ' धौम्य म्हणे तुज यावें शास्त्रसह कंठपाठ वेदानीं । - मोआदि २ . ५१ . ०भुषण न. गळ्यांतील दागिना . ०मणी पु. १ गळ्यांतील हाराभरामधील मुख्य मणी ; गळ्यांतलें रत्न . २ गळ्यांचा मणका . घांटी . ३ ( ल .) अतिशय लाडका ; गळ्यांतील ताइत ( माणुस , वस्तु ). ' आवडते कंठमणी ही .' - संग्राम २९ . ०मर्याद क्रिवि . गळ्यापर्यंत आकंठ पहा . ' आज मी कंठमर्याद जेवलों ०माधुर्य न. ( गायन ) सुंदर गळा ; गोड आवाज . ( सं .) ०माळ स्त्री. ( गो .) गंडमाळा . ०रव पु. आवाज . ( सं .) ०रवानें ०रवेंकरुन १ मुद्दाम ; निश्चयानें ; स्पष्टीक्तीनें . २ मोठमोठ्यानें ओरडून ; घसा फोडुन ; कंठशोष करून . ०रवोक्त वि. निश्चयानें सांगितलेलें ( भाषण इ० ). ०शोष पु. १ ( तहाननें ) घशाला पडणारी कोरड . २ ( ल .) ओरड ; उगीच घसा कोरडा करणे ; घसाफोड ; व्यर्थ समजूत ( काढणें ); ( क्रि०करणें ). ' वादी प्रतिवादीकडुन अतोनात कंठशेष होत असतांहि ...' - टि ४ . १३१ . ( सं .) ०सूत्र न. जानवें . २ मंगळसुत्र . ( सं .) ०स्थ वि. १ घशांत अडकलेलें ( बेडका , प्राण ). २ गळ्यांतील ( दागिना इ० ) ३ ( ल .) जिव्हाग्रीं ; पाठ असलेला ( अभ्यास , पाठ , इ० ). ४ कठस्थ वर्ण ( गळ्यांतून ज्यांचा उच्चार होतो तें ; - अ , आ , क , ख , ग , घ , ड , ह ). ( सं .) ०स्थान न. गळा . - वि . कंठस्थ पहा , ०स्नान न. १ गळ्यांखालचें स्नान ( विशेषत ; बायकांचें ), क्रि०करणें ). २ ( ल .) मान छाटणें ; शिरच्छेद ; करणें . ( शीर छाटल्यानें आंतून वाहणार्या रक्तानें होणारें स्नान ); नागवणें ; लुटणें . ( क्रि०घालणे ). ' धोंडी वाघासारख्या काळपुरुषास ज्यानें कंठस्नान घातलें . त्या बापू गोखल्याच्या पराक्रमाचें वर्नन काय करावें ?' ( सं .) कंठाग्र - न . घसा ; ध्वनि इंद्रिय . कंठ अर्थ ५ पहा . ( सामान्यत ; सप्तम्यंत प्रयोग ). कंठाग्रीं . ' कंठाग्री संधांनीं धरियेला हरी । अवघ्या विखारीं व्यापियेला । ' ( सं .) कंठाभरण - न . १ गळ्यांतील एक अलंकार . ' सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें .' - एरुस्व ६ . ८७ . २ घोड्याच्या मानेखालीं असलेला शुभदायक भोंवरा . ३ गळ्यांतील ताईत ; प्रिय . कंठावरोध - पु . घसा दाटून येणें ; घसा धरणें , बसणें . ( सं .)
|