Dictionaries | References

ताटाबरोबर कांठ

   
Script: Devanagari

ताटाबरोबर कांठ     

जुगार इ. कांत उधळून दिलेला बराच मोठा ऐवज परत मिळविण्याच्या प्रयत्‍नांत उरलासुरला ऐवज खर्च करून टाकणें. [एका मनुष्‍याने जुगारात सर्व संपत्ति घालविली. शेवटी एक चांदीचे ताट शिल्‍लक राहिले होते तेहि जुगार खेळून घालविले. परंतु घरी येऊन पाहतो तो त्‍या ताटाच्या कांठाचा एक तुकडा पडलेला मागे राहिलेला आढळला. तेव्हा त्‍या तुकड्यापासून आरंभ करून पुन्हां आपले ताट व नंतर सर्व संपत्ति परत मिळवूं, अशा आशेने तो पुन्हां जुगार खेळावयास गेला
परंतु ताट परत मिळण्याच्या ऐवजी जिकडे ताट तिकडेच त्‍याचा कांठहि गेला?]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP