Dictionaries | References

गोळा

   
Script: Devanagari

गोळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Joco remoto, to grasp a ball of rice; to sit at meat.

गोळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A globe. A mass. An assemblage. A wretch without arms and legs or without the power of using them A morsel.
गोळा करणें   gather together.
गोळाभर   A belly-full.
गोळा मारणें   gobble.

गोळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू   Ex. जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  साधारणतः वाटोळ्या आकाराचा पदार्थ   Ex. कुंभार मातीचा गोळा चाकावर ठेऊन त्याला आकार देतो.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कोणताही वाटोळा पदार्थ   Ex. गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasاجرامِ فلکی
mniꯃꯇꯨꯡ꯭ꯇꯥꯕ꯭ꯄꯣꯠ
telగోళాకారపు వస్తువు
urdاجرام , اجسام
   see : एकत्रित

गोळा

  पु. गोल ; गोलक ; चेंडू . २ वर्तुलाकार पदार्थ ; पिंड ; भेला ; डिखळ ; रास . ३ जथा ; जमाव ; मेळा ( मनुष्य , पशु , वस्तु यांचा ). ४ ( ल . ) हातपाय नसलेला किंवा ते लुळे झालेला माणूस ; पांगळा . ५ ( निंदार्थी ) जेवण ; भाकर - तुकडा ; पिंड ; घांस . ६ धुपावणें ; दुवेतणें ; गर्भपात , स्त्राव . ७ नाकांतील चांदीचा वेंसर ( मोत्याऐवजीं ). ८ फळांतील विशिष्ट नांव नाहीं अशा अठी , बीं , गर , गर्भांश इ० ना लावतात . जसें :- बदाम - पिस्ते - काजू - भुईमूग - ताड - उंडे - एलची - गोळा . हीं मोत्यें शुध्द कर्दळाचे गोळे आहेत . ९ ( व . ) लाडू ; ढोकळा . बेसनाचे - गूळपापडीचे गोळे . १० प्लेगची गांठ . ११ तोफेची मोठी गोळी . १२ सांठा ; समूह . १३ ( गो . ) गोल आकाराचें भांडें ; गुंड ; गुंडा . - वि . १ चिंब या अर्थी ओला शब्दाबरोबर प्रयोग . चिरगुटाचा ओला गोळा पडला आहे . हीं लांकडें ओलीं गोळे आहेत . २ एकत्रित ; एकत्र होई असा . [ सं . गोलक ; प्रा . गोलओ , अप . गोलउ हिं . बं . गोला ; पं . गोळा ] ( वाप्र . )
०करणें   एकत्रित करणें .
०गिळणें   ( लांच ) खाणें .
०टाकणें   गर्भपात होणें .
०देणें   जेवणें . दिवसास एक वेळ गोळा दिल्हा म्हणजे आठा प्रहरांची काळजी वारली .
०मारणें   गपापा करून टाकणें .
०होणें   १ गोळयाप्रमाणें गात्रें एकत्रित होणें . झोपेनें या मुलाचा गोळा होऊन गेला आहे . गोळाविणें - उक्रि . ( राजा . ) १ गोळा - जमा करणें . २ ( ल . ) मिळविणें ; संपादणें . गोळेगांवाला वेढा घालणें - पडणें - अक्रि . जेवावयास बसणें . सामाशब्द -
०गोळी  स्त्री. परस्पर ( बंदुकीतोफा यांच्या ) गोळयांचा भडीमार ; मोठा तोफेचा भडिमार .
०बेरीज  स्त्री. १ ( अंकगणित ) ठोक बेरीज किंवा तेरीज . २ ( ल . ) तात्पर्य ; सारांश ; निष्कर्ष ; मथितार्थ .
०करणें   ( हिशेब ) लबाडीनें कांहीं बाबी दाबून किंवा खोटया लिहून ठोक बेरीज किंवा तेरीज देणें .
०भर वि.  पोटभर ; भूक शांत होई इतका .
०भाजी  स्त्री. पीठ लावून किंवा तांदुळाच्या कण्या घालून केलेली भाजी ; हिच्या उलट मोकळी भाजी .

गोळा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP