|
न. वि. ( व्या . ) वर्तमान क्षणापूर्वी गेलेला काळ ; भूतकाळ . राक्षस ; पिशाच ; स्मशानांत संचार करणारी , झाडांवर वास्तव्य करणारी , प्रेतांस सजीव करणारी , मनुष्यें खाणारी एक दुष्ट योनि . कधीं कधीं देवास , मूर्तीस वास करणार्या चित्कलेस लक्षणेनें हा शब्द लावतात . पंढरीचें भूत मोठें । भावार्थीया झडपी नेटें । गेलेला ; झालेला . भूत भविष्य कळों यावें वर्तमान । - तुगा २११२ . मृताची छाया ; पिशाच ; समंध . तीं त्या पाहूं न शकति जेंवि नृहरिमंत्रजपपरा भूतें । - मोभीष्म ५ . १५ . ( समासांत उत्तरपदीं ) झालेला ; एखाद्याच्या स्थितींत शिरलेला आणि स्थित असणारा . उदा० पात्र - विषय - आधार - आश्रय - सिद्ध - साधन - भूत . समासांत पदांतीं ई प्रत्यय लागून कांहीं समास होतात . उदा० कारणी - प्रमाणी - शुद्धी - पवित्री - भस्मी - वशी - द्रवी - भूत इ० . [ सं . ] ( वाप्र . ) न भूतो न भविष्यति - विलक्षण गोष्ट . जें कधीं नव्हतें व कधीं होणार नाहीं अशी गोष्ट . ( ल . ) विटलेली खराब झालेली वस्तु . वाळले चिळले तुकडे विटून त्याचें भूत झालेलें . - नामना ८० . ०पूर्व वि. पूर्वी झालेला ; मागील काळांत असलेला , झालेला . [ सं . ] उपदेवतांचा एक विशिष्ट वर्ग , योनिविशेष . ०भविष्य वि. पृथ्वी , आप , तेज , वायु ; आकाश या पंचतत्त्वांपैकीं कोणतेंहि आदितत्त्व . ऐसी दोनी भूतें खाये । - ज्ञा ६ . २४० . सृष्ट पदार्थ ( सजीव , निर्जीव ); कोणतेंहि द्रव्य , तत्त्व , कारण . सोळा सूक्ष्म भूतादि सत्रावा जीव ( पंचकम्रेंद्रियें , पंचज्ञानेंद्रियें , पंचतन्मात्रा , मन व जीव ). झालेलें व होणारें . प्राणी . मजयुद्धाभिप्रायापासुनि मागें बळेंचि फिरवील । ऐसें भूत नसेचि त्रिजगीं ... - मोकर्ण २७ . ५४ . ( व्या . ) भविष्यकाळीं एखाद्या क्रियेचा व्यापार होऊन गेला असेल असा अर्थ ज्या क्रियापदाच्या रुपापासून निष्पन्न होतो तो ( काळ ). [ सं . ] ( कायदा ) खरी , जशी घडली तशी गोष्ट . ०भूत वि ( व्या . ) भूतकाळीं व्यापार होऊन संपला असा क्रियापदाच्या रुपापासून बोध होतो तो ( काळ ). [ सं . ] भूतलें वि . ( सोंगट्यांचा खेळ ) एकदां मारली गेली असून पुनः डावांत बसलेली सोंगटी . [ सं . भू = होणें ] अनुभविलेलें ; भोगलेलें . मग जीवें भूतलीं जियें संकटें । - ज्ञा ११ . ५७६ . ०घालणें मंत्रतंत्रानें एखाद्याच्या अंगांत भुताचा संचार , घरीं भूतबाधा करविणें . जनासि घालिती भूतें । - दावि ४८० . भूत म्हणतां भूत लागतें , लागावयाचें भूत म्हणा म्हणजे भूत शिरलेंच . भूत पुढें दत्त म्हणून उभेंच . भुतें नाचणें ( घरांत , गावांत , रानांत ) एखाद्या स्थलाचा भणभणीतपणा दर्शविण्या करितां उपयोग करितात . सामाशब्द - झालेलें ; होऊन गेलेलें . तरि भूतलें आठवे । - ज्ञा १३ . १२२ . ०केत खेत प्रेत - न . ( व्यापक ) भूत ; प्रेत ; पिशाच ; राक्षस इ० [ भूत + केत ( द्वि ); भूत + प्रेत ] ०कोलीत न. पिशाच . दीपिका . ०खान न. ( ल . ) जिचे केस मोकळे अस्ताव्यस्त सुटलेलें , वस्त्रें घाणेरडीं , आणि स्वरुप भयंकर व हिडीस आहे अशी स्त्री , मुलगी ; विद्रूप मूल . [ भूत + फा . खान ] ०खाना पु. भुतें , पिशाचें आणि वेताळ यांचा उपद्रव असलेली जागा . भुतें , पिशाचें यांच्या खोड्या , चेष्टा व दुष्ट कृत्यें ; भूतचेष्टा . ( क्रि० उठणें ; माजणें ). जिकडे तिकडे भूतखाना उठला आहे , दुपारची बाहेर जाऊं नको . भुतांचा समुदाय . ( ल . ) एका ठिकाणीं गोळा झालेल्या मुलांचा जमाव . अडाणी लोकांची दंगल . भयंकर व हिडिस माणूस . ( निंदेनें ) घाणेरडी व अव्यवस्थित जागा . फ्रीमेसन संस्था . [ भूत + फा . खाना ] ०खीच स्त्री. भूतांची खिचडी ; प्राण्यांचा नाश . नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोटविलीं । - ज्ञा ११ . ३४३ . ०ग्राम पु. स्थावर व जंगम वस्तू . पंचमहाभूतांचा समुदाय . [ सं . भूत + ग्राम ] ०चेष्टा स्त्री. भुतांचा खेळ , कृति , चमत्कार . ( शरीरबाधा होणें , भ्रम होणें , ठेवल्या जागेवरुन पदार्थ अकस्मात नाहींसा होणें इ० ). [ सं . ] ०जात न. जीवमात्र ; सर्व प्राणी . तुवां जन्मौनि पोसिलीं । भूतजातें । - ऋ ४५ . [ सं . ] भुतंडा , भुतांडा पु . गांजणूक ; कुतरओढ ( स्त्राष्टधनी , तगाददार इ० कांची ). दबडगा ; दगदग ( कामाची ) ( क्रि० लागणें ). ०त्रय न. पृथ्वी , आप व तेज . लोप आथी भूतमात्रा । देहींचा देही । - ज्ञा ६ . २९८ . [ सं . ] ०दया स्त्री. प्राणिमात्रावर करावयाची दया . ०पति पु शिव ; शंकर . [ सं . ] ०पीडा स्त्री. भूतबाधा . [ सं . ] ०प्रलय पु. सर्व सजीव व निर्जीव वस्तूंचा नाश ; सर्वंगत प्रलय . भुतांच्या बेसुमार चेष्टा . [ सं . ] ०प्रेत न. भूतकेत पहा . [ सं . ] ०बाधा स्त्री. भुताची पीडा ; भुतांनीं उत्पन्न केलेला रोग , दुसरी एखादी अनिष्ट गोष्ट . [ सं . ] ०भाव पु. प्राणिमात्र . तेवीं भूतभावीं नाशिवंत । अविनाश जें । - ज्ञा ८ . १७७ . [ सं . ] ०भावन वि. जग ह्या कल्पनेचा आश्रय . मी ये परीचा भूतभावनु । परी सर्व भूतांसि अभिन्नु । - ज्ञा ९ . ८६ . जग उत्पन्न करणारा ; पालन करणारा . [ सं . ] ०यज्ञ पु. पंचमहायज्ञापैकीं एक ; वैश्वदेवांतील बलिहरण . पंचमहायज्ञ पहा . ( विनोदानें ) आपल्या देहातील पंचमहाभूतांस बलिदान . जेवण , भोजन देणें . ( क्रि करणें ). [ सं . ] ०वेळ स्त्री. भर दुपार . संध्याकाळ व मध्यरात्र ( या वेळीं भुतें बाहेर पडतात ). ०वैद्य वि. देवऋषी ; पंचाक्षरी . [ सं . ] ०शुद्धि पूजेच्या , एखाद्या संस्काराच्या पूर्वी करावयाचा एक विधि . [ सं . ] ०संचार पु. पिशाचबाधा ; अंगांत भूत येणें . [ सं . ] ०सृष्टि स्त्री. भुतांच्या शक्तीनें उत्पन्न झालेली माया ; ऐंद्रजाल . मांत्रिक , जादुगार , गारुडी यांनीं केलेली ठकवणूक , हातचलाखी , नजरबंदी . भूतांचा समुदाय . पंचमहाभूतात्मक जग ; पंचमहाभूतांपासून ईश्वरानें उत्पन्न केलेलीं शरीरें ; संयुक्त पंचमहाभूतें . ( ल . ) अकस्मात उत्पन्न होऊन क्षणांत नाश पावणारे , बुजबुजणारे कोट्यवधि प्राणी ( माशा , आळ्या , कृमी इ० ). [ सं . ] भुतांची घाई - स्त्री . अंगांत आलेल्या भुताचें झपाट्याचें धापलणें आणि चलनवलन . मालमत्तेवर भुतांनीं केलेली धामधूम व खोडसाळपणा . तंववरिच भुतांची घाई । जंव मंत्रवादी नाहीं पावला । भुताची दिवटी - स्त्री . दलदलीच्या जमीनींतून निघणारी दीप्तिमान हवा . ही सपक्ष सर्पासारखी अंतरालांत उडाल्यासारखी दिसते . ( इं . ) ड्रॅगुन . - राको ५८३ . भुताटकी - स्त्री . एखाद्याचें वाईट , बरें करण्यासाठीं भुतांस कांहीं देऊं करुन त्यांना उठवण्याची , घालण्याची , काढण्याची विद्या , धंदा ; जादूगिरी ; चेटूक . भुतांचा व्यवहार , चेष्टा इ० . [ भूत + अटकी का . आटकी = खेळ ) ] भुताटक्या , की - वि . भुताटकी करणारा . भुताटणें , भुतारणें - अक्रि . ( राजा . ) राग इ० मुळें भूत अंगांत संचरल्याप्रमाणें चाळे करणें . भूतांत - पु . ( महानु . ) काळ ; यम . तुज सदा भूतांत तो ही भीये । - गस्तो ६५ . भूतात्मा - पु . शरीर ; देह . जीवाचें व क्रियेचें उपादानकारण असें मूलभूत तत्त्व ; प्राणिमात्रांचा आत्मा . देव . [ सं . ] भूताभास - पु . जग भासणें ; जगाचा आभास . आणि भूताभासु आधींच सरे । - ज्ञा ९ . ८० . [ सं . भूत + आभास ] भुतारणें - अक्रि . ( राजा . ) भुताटणें . भुतारा , री , भुतेरा - पुस्त्रीपु . भुतें काढणारा ; पंचाक्षरी . भुतारें - न . लहान भूत भूतार्त - वि . भुतानें पीडिलेला . [ सं . भूत + आर्त ] भुतावळ , भुताळ , ळें - स्त्रीन . भुतांची , पिशाचांची जमात . ( क्रि० उठणें ; येणें ; लागणें ). ( समुच्चयानें ) भुतें आणि पिशाचें ; त्यांचा सर्व गण , वर्ग ( ल . ) लुच्चे , सोदे , शठ , भिकारी किंव द्वाड आणि त्रासदायक मुलें यांची गर्दी ; हलकट लोकांची टोळी . ( क्रि० माजणें , उठणें , जमणें ). [ सं . भूत + आवलि ] म्ह० वेताळाचे मागें भुतावळ आहेच भुताळा , ळ्या - वि . दुसर्याचा नाश होण्याकरितां त्यावर भुतें घालणारा ; पंचाक्षरी ; चेटक्या . भूतावळी - स्त्री . भुतावळ ; भुतांचा समुदाय . तैसें वीरक्तिचीये भूतावळी । नेदिजे देहदमनाची वळी । - भाए २२३ . भूतावळी औट कोटी । - दा २० . ६ . २६ . [ सं . भूत + आवलि ] भूताविष्ट - वि . भूतसंचार झालेला . [ सं . भूत + आविष्ट ] भूतावेश - पु . भूतसंचार ; पिशाचसंचार . [ सं . भूत + आवेश ] भूताहिती - पु . देव - पितर - आत्म - ऋण न देणारा . - हंको . [ सं . ] भुतेंखेतें - नअव . भुतें , पिशाचें , हडळी , समंध इ० . भुतोंडी , भूतोंडी - स्त्री . पंचमहाभूतांस म्हणजे देहाच्या घटकांस दिलेला भाग , घास , फराळ , अल्पाहार . ( क्रि० देणें ). भुतांला भुतोंडी द्यावी मग निघावें . भूतबळी . ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं । - ज्ञा ९ १८४ . [ सं . भूत + उंडी ] भुत्या , भुता - पु . भवानी देवीच्या भगतांच्या वर्गांतील एक व्यक्ति ; देवीचा उपासक . हे गळ्यांत कवड्यांच्या माळा , अंगावर तेलकट वस्त्रें आणि हातांत पोत ( जळता काकडा ) घेऊन भिक्षा मागत फिरतात . भुत्याचें झाड , भुत्या - नपु . एक झाड . याचें लाकूड जळतांना प्रकाश पडतो . दिवट्या , रव्या इ० करण्याकडे याचा उपयोग करतात . या लाकडाची रवी पुरली असतां तिला अंकुर फुटतो असे म्हणतात . म्हणून या रवीच्या योगानें चेटकांचा प्रतिकार होऊन लोणी येतें अशा समजुतीनें लोणी येण्याकरितां हिचा उपयोग करतात . भूतोन्माद - पु . भूतावेशामुळें उत्पन्न झालेलें वेड ; यांत रोग्याचें संभाषण , पराक्रम , शक्ति व हालचाल , तसेंच तत्त्वज्ञान , शिल्पज्ञान इ० जाणण्याची शक्ति हीं अमानुष असतात . या उन्मादाच्या लहरीचा काल ठराविक असतो . - योर १ . ७३२ . [ सं . भूत + उन्माद ]
|