Dictionaries | References आ आई Script: Devanagari Meaning Related Words आई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मृत्यु काल, आयु आई कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आजी आई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term expressing Fraternity or Brotherhood. आई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A mother.आईजीच्या दोंदावर बाईजी उदार. Used where one person is generous upon the property of another.आई जेंवू घालीना, बाप भीक मागू देईना A fix, a dilemma; betwixt two difficulties. आई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अम्मा , अम्मी , जननी , जन्मदात्री , ममी , माउली , माता , मातुश्री . आई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जन्म देणारी स्त्री Ex. आई ही मुलांची पहिली गुरू आहे. HYPONYMY:तडित्प्रभा वीरमाता राजमाता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माय माऊली माउली मातोश्री मातुश्री जननी जन्मदात्री माताWordnet:asmমা bdआय benমা gujમાતા hinमाँ kanಮಾತ kasموج kokआवय malഅമ്മ mniꯃꯃꯥ nepआमा oriବୋଉ panਮਾਤਾ sanमाता tamஅம்மா telఅమ్మ urdماں , والدہ , مائی , اماں , مادر , ام noun एखाद्या पूज्य किंवा आदरणीय स्त्री किंवा देवीच्या नावाआधी किंवा तिला संबोधित करण्यासाठी वापरला जाणारा शब्द Ex. येथील आई भवानीचे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. /हे माता पार्वतीचे मंदीर आहे.. ONTOLOGY:उपाधि (Title) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माताWordnet:kasماتا , مان sanमाता आई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक भावदर्शक प्रत्यय . हा विशेषणास लावला असतां भाववाचक नाम होतें . उ० भला - भलाई कुचर = कुचराई ; नरमाई , बारकाई , गनिमाई . [ फा . ]जननी ; माता . आई वदे बा न मानीं संकट - दावि १६० .जगदंबा ; देवी ; देवींच्या नावापुढें लावावयाचें उपपद ; जसें - तुकाई , मरीआई , काळआई .( सांकेतिक ) वारकरी पंथांतील लोक ज्ञानेश्वरीस म्हणतात .( सामा . ) देवी आईच नवसु नाहीं पुरविला - दावि ३४७ .देवी ( रोग ); फोड्या .लहान मुलाला लडिवाळपणें संबोधितात . [ सं . आर्ये , किंवा अयि ? सं . आदि ? प्रा . आइ ? ] शिवाय अइ पहा . म्हआईचें दूध कीं गायीचें दूध = दोन समान गोष्टीपैकीं सरसनिरस ठरवितां येत नाहीं अशा वेळीं योजतात . यासारखीच दुसरी म्हण आई गोड कीं खाई गोड .आईजीच्या दोंदावर ( जिवावर ) बाईजी उदार = दुसर्याच्या मालमत्तेवर उदारपणा दाखविणें ; आयती चैन करणें .आई जेवूं घालीना , बाप भीक मागूं देईना = दोन संकटें आलीं असतां किंवा दोन परस्परविरुध्द मतांच्या अधिकार्यांची मर्जी संभाळावयाची असतां योजतात ( इकडे आड तिकडे विहीर याप्रमाणें ).एका आईचीं लेंकरें = बंधुभाव दाखविण्याकरितां योजतात .लहानपणीं आई आई , थोरपणीं बायलाबाई = लहानपणीं आईची आठवण वारंवार होते पण प्रौढपणीं स्त्रीमुळें विसर पडतो .आई मेल्यावर बाप मावसा ( निष्काळजी ) होतो .०आंग न. आईपणा - मायपणा ज्या अंगापासून येतो तें अंग ; स्त्रीचें किंवा प्राण्यांतील मादीचें जननेंद्रिय , व आंतील गर्भाशयाचा भाग ; गुह्यांग . बाळंत होतांना तिला त्रास झाला , आईअंग बाहेर आलें [ आई + अंग ]०काळी स्त्री. शेतजमीन . ही आईसारखी पोषक असते म्हणून आदरार्थी . - गांवगाडा . [ आई + काळी = शेतजमीन ]०पांढर स्त्री. गांवठाण ; गांव ज्या जमिनींत वसतो ती जमीन ; ही शेताच्या निरुपयोगी म्हणजे साधारण पांढर्या रंगाची असते . [ आई + पांढरी ]०पोरका वि. आईवांचून उघडा पडलेला ; ज्याची आई मेली आहे असें ( मूल )०बाई स्त्री. आईसारखी वयानें श्रेष्ठ , सुस्वभावी अशी बाई ; आईप्रमाणें स्त्री . म्ह० देई घेई ती आई बाई , न देई ती मसणांत जाई .शेजारची बाई ; शेजारपाजारची स्त्री ; शेजारीण .कोणी तरी बाई . ( अनेकवचनी उपयोग ). म्ह० परीट नागविला तर आयाबाया नागविल्या = परटाच्या येथें चोरी झाली तर त्यांचें कांहीं जात नाही , उलट इतर लोक उघडे पडतात .०करणें खुशामत करणें ; गोंजारणें .०बाप पु. आई व बाप ; वडील व मातोश्री ; मातापिता . ( अव . ) आई व बाप . माझीं आईंबापें आणि माझे शिक्षक जें मला सांगतात तें कां केलें पाहिजे ? - मराठी ३ रें पुस्तक ( १८७३ ) पृ . ४१ . आईबापावरुन पावणें , आईबाप उध्दरणें आईबापावरुन शिव्या देणें ; वेड्यावांकड्या , वाईट शिव्या देणें .०माई स्त्री. व्यापक अर्थानें बाई ; एखादी आईसारखी मानलेली स्त्री , माउली ; आई - बाई .०माई - आईवरुन शिव्या देणें .उध्दरणें - आईवरुन शिव्या देणें .०माई - खुषमस्करी करणें ; मनधरणी करणें .करणें - खुषमस्करी करणें ; मनधरणी करणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP