Dictionaries | References

माउली

   
Script: Devanagari
See also:  मा , मां , मांई , माई , मावली

माउली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Commonly मावली.

माउली     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A mother. Generally in poetry.

माउली     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आई, ज्ञानेश्वर

माउली     

 स्त्री. 
 स्त्री. ( काव्य )
आई किंवा आईप्रमाणें मानिलेल्या वृद्ध बाईस आदरानें म्हणतात ; गरीब , प्रेमळ , धर्मशील स्त्री ; माउली पहा . मुखीं प्रगट होय जी करि सुखी जना मावली । - केका ७३ .
मावली ; आई . सासुरवासें शीणली । तिये भेटे जेंवि माउली । - ऋ ११ .
( लडिवाळपणें ) आईस म्हणतात . बुझावीतां माउली काय बोले । अम्ही देवासी नाहिं पूजियेले । - ध्रुवचरित्र ११ . ( नवनीत पृ . ४११ ).
आईसारखी कोणतीहि भली स्त्री . त्या माउलीच्या सदगुणांचें कीर्तन करावें तें थोडेंच . - विवि १० . २१८ .
( - अव . ) जलदेवता . [ सं . मा ]
जलदेवता . [ सं . मातृ ] माऊल , पण , पणा - नपु .
आईची माया ; दयाळूपणा ; ( सामा . ) माणुसकी . [ माउली + पण , पणा ] माउशी , माऊशी , मावशी , माउसी , माऊसी , मावसी - स्त्री .
मावशी ; आईची बहीण .
( ल . ) सापत्नमाता . ध्रुव पितयाचे अंकीं बैसला । तंव माउशियेनें ढकलिला । - कथा ७ . १० . ८ . माऊसबहीण - स्त्री . मावशीची मुलगी . [ मावशी + बहीण ] माऊसभाऊ - पु . मावशीचा मुलगा . माऊसा , मावसा - पु . मावशीचा नवरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP