Dictionaries | References

चोज

   
Script: Devanagari

चोज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A wonder or marvel. Ex. आणीक चोज म्यां नवल देखिले ॥ उफराटें झाड &c. ॥; म्यां पाहिलें खरें पण मला मोठें चोज वाटलें. 2 Esp. with जिवाचे and pl Airs and fancies; humors and whimsies; dainty or delicate ways: also without जिवाचे, Tricks and pranks; drollery and fun; eccentric freaks and frolics. v कर. 3 Treating as a marvel; esteeming very precious; cherishing dotingly or fondly and holding daintily or delicately. v कर. Ex. लक्ष्मी चोजें पादांबुज वंदी ॥; also बाळक बोबडा बोली वांकडा विचुका पा- उलीं ॥ चोज करुनि माउली रिझे जेवीं ॥. The child lisps and mumbles, speaks wildly or sillily, and steps awkwardly; Mamma, however, makes him her darling and is delighted. See notice under चोजणें.

चोज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A wonder. Airs and fancies: delicate ways. Treating as a marvel.

चोज     

 न. १ नवल ; आश्चर्य ; आश्चर्यकारक गोष्ट ; चमत्कार . अहो पाहता कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे । परि न पाहतांही दिसे । चोज आइका । - ज्ञा ११ . २२९ . पाहत होतां गंगानुज । म्हणे कैसें झालें चोज । - गुच १९ . ४४ . २ कौतुक ; लाड . नातरी बालक बोबडा बोलीं । कां वाकुडा विचुका पाउलीं । ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं । - ज्ञा ९ . ६ . हातीं धरूनियां काढिला बाहेरी । देखोनियां करी चोज त्यासी । - तुगा २० . ( क्रि० करणें ). ३ प्रेम ; प्रीति . पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज । - ज्ञा ६ . १२३ . ४ करामत . भीमा दाखवी आपलें चोज । - मुविराट ५ . ९१ . ५ नखरा ; चेष्टा ; चाळा ; गंमत ; मजा ( अनेकवचनी प्रयोग ). ( क्रि० करणें ). [ सं . चोद्य = आश्चर्य , नवल ; प्रा . चोज्ज ] ( वाप्र . ) ( जिवाचें ) - चोज करणें - नखरे ; चाळे करणें ; आपण नाजूक आहोंत असें मानणें ; जिवाचें कोडकौतुक पुरविणें ; स्वत : ला फार जपणें . चोजणें - अक्रि . ( काव्य ) समजून , कळून येणें ; कल्पनेस नवलाईप्रमाणें दिसून येणें , वाटणें ; मनास कौतुकास्पद भासणें . कां काळा राहे काळावखा । तो आपणा ना आणिकां । न चोजवे तरि असिकां । हा मी बाणे । - अमृ . ४ . ३६ . हे ज्ञानासीं न चोजवे । ध्यानासी ही नागवे । सामाशब्द -
०बावळा वि.  चमत्कारिक ; विलक्षण ; तर्‍हेवाईक ; खुळचट ; अर्धवट ; वेडसर ( बोलणें , भाषण ). [ चोज + बावळा ] चोजवणें , चोजविणें - अक्रि . १ ( काव्य ) कौतुकास्पद असणें , वाटणें , होणें . द्वारकेचें केणें निश्चित । पंढरीस आलें चोजवत । २ समजणें ; जाणवणें ; कळून येणें . तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । - ज्ञा ६ . ५ . कवण कार्य तें यथार्थ । चोजवेना अनुमाना । - मुवन ८ . १३७ . ब्रम्ह इंद्रियांच्या मेळें । चोजवेना । - दा ७ . २ . ४ . ३ आवडणें ; कौतुक वाटणें . ब्रह्मांडनायक चोजवेना । हें बरें नव्हे । - दा ६ . १ . १३ . ४ संतोषणें ; प्रसन्न होणें . सदगुरूचें कृपें चोजवतां देव । - दावि ३३३ . - सक्रि . १ आश्चर्यचकित करणें ; नवल वाटावयास लावणें ; विस्मित करणें . राया चोजविलें वचनीं । २ कौतुक करणें . चोजवित घरा येती । ज्यांचा देखती शुध्द भाव । - निगा १६४ . ३ शोधणें ; तपास करणें . कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपण भिकारी अर्थ नेणें । - तुगा ८९२ . चोजावणें - अक्रि . चोजणें ; कौतुकाकुल , विस्मित होणें . राय चोजावला वचनीं । - मुआदि १८ . ३३ . [ चोज ]

चोज     

जिवाचें चोज करणें
नखरे, चाळे करणें
स्‍वतःचेच कौतुक करणें
स्‍वतःची हौस पुरी करून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP