Dictionaries | References उ उभें Script: Devanagari Meaning Related Words उभें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उभा पहा .उभारणी ; मांडणी . म्हणोनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभें । - ज्ञा १८ . २४७ .०काम न. जरुरीचें , अगत्याचें , निकडीचें काम . माझीं अगदीं उभीं कामें तीन आहेत , तेव्हां मला तुमच्या बरोबर यावयास फुरसत नाहीं .वस्त्र सरासरी नुसतें गुंडाळून घ्यावें असा स्त्रियांचा वस्त्र नेसण्याचा प्रकार .०कुंकू न. वैष्णव स्त्रिया लावतात त्या पद्धतीचें , उभ्या गंधासारखें ( बदामी आकाराचें ) लावलेलें कुंकू .०कुंड न. ( चांभारी धंदा ) चामडें भिजत ठेवण्याकरितां लागणारें रांजणाच्या आकाराचें खापराचें कुंड .०खाणें क्रि . सर्वसमूळ नाहींसें करणें . लोह उभें खाय माती । तें परिसाचिये संगती । सोनें जालया पुढतीं । न शिविजे मळें । - ज्ञा १८ . १४०७ .०नेसणें घेणें लावून घेणें लावणें - ( लुगडें , पडदणी , धोतर वगैरे )= तात्पुरतें ( सरासरी दहा - अकरा हात ) वस्त्र , प्रथम पदर घेऊन बाकीच्या वस्त्राच्या निर्या करुन पोटावर मधोमध धरुन उजवी कडील पदराचें आणि डावीकडील पदराचें अशीं दोन टोकें घेऊन त्यांस निर्यांवर घट्ट गांठ मारल्यावर शेवटच्या पदराचें टोंक धरुन कासोटा घालणें ; कसें तरी एखादें वस्त्र नेसणें ; स्नान करण्याकरितां लहानसें वस्त्र नेसणें ; आडवें नेसणें याच्या उलट . या दोन वाक्प्रचारांचे अर्थ कोंकण व देश या प्रांतांत परस्परविरुद्ध आहेत . कोंकण प्रांतांत आडवें नेसणें याचा अर्थ व्यवस्थितपणानें व पद्धतशीरपणानें नेसणें असा होतो , तर देशावर , आडवें नेसणें याचा अर्थ आड लावून घेणें , तात्पुरतें किंवा लहान वस्त्र नेसणें असा होतो .०पीक न. शेतांत तयार झालेलें पण न कापलेलें पीक . या जागेंत उभीं पिकें असून ... - डुकराची शिकार ( बडोदें ) २० .०वर्ष न. सबंध वर्ष ; आरंभापासून अखेरपर्यंत वर्ष . उभ्या वर्षांत मी आईबापांना भेटलों नाहीं .०दुखणें न. आंथरुणास न खिळविणारें , साधें दुखणें ; किरकोळ दुखणें .०पण न. उभा असलेली स्थिति .( ल . ) जिवंतपणा . आतां उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । - ज्ञा ८ . ६३ .०पळणें क्रि . उभ्याउभ्यां , न थांबतां एकसारखें पळत जाणें .०वारें न. गडबड ; गोंधळ ; धांदल ; त्रेधा .उदासीनता ; औदासिन्य . ( क्रि० सुटणें ).०वैर उभादावा पहा .०सुकणें झाड उभ्या स्थितींत असतांच वाळणें .सर्व शरीर दु : खानें , काळजीनें कृश होणें , वाळणें . लेंकरुंवाचेनि दु : खें । जेवि माउली उभी सुके । - ऋ ४६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP