Dictionaries | References

आई गेली म्हणजे बाप पाहुणा

   
Script: Devanagari

आई गेली म्हणजे बाप पाहुणा     

एकत्र कुटुंबामध्ये ज्या गृहस्थाची स्त्री जिवंत आहे त्याच्या मुलांची योग्य तर्‍हेनें जोपासना होते व त्या पुरुषालाहि लागणार्‍या गोष्टी वेळचे वेळेवर मिळतात व त्यास आपल्या बायकोस सांगून सर्व गोष्टी करून घेतां येतात. पण तीच त्याची स्त्री मेली म्हणजे घरांतील इतर स्त्रियांशी त्यास संकोचानें वागावे लागते व त्यामुळे त्याची व त्याच्या मुलांचीहि हेळसांड होते. त्याच्या बोलण्याकडे अगत्यपूर्वक लक्ष्य देणारे कोणी माणूस नसते. आईच्या मागे बाबाचे लक्ष मुलांकडे विशेष नसते, हे दाखविण्यासाठी योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP