Dictionaries | References

बाप

   
Script: Devanagari

बाप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह जो किसी कला,गुण आदि में किसी से बढ़कर हो   Ex. कम्प्यूटर संबंधी जानकारी के मामले में आशीष तुम्हारा बाप है ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবাপ
bdबिफा
benবাবা
kasوۄستہٕ
malകാലന്
marबापमाणूस
nepबाउ
sanगुरुः
urdباپ
See : पिता, पिता

बाप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāpa m A father.

बाप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A father.

बाप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वडील, बापमाणूस, वडील

बाप     

 पु. 
पिता ; जनक .
( बापासारखा ) चुलता . ( धृतराष्ट्र भीष्मास म्हणतो ) कीं माझा वधिला शिखंडिनें बाप । - मोकर्ण १ . १२ .
( काव्य . ) संस्कृतांतील तात शब्दाप्रमाणें अनुकंपार्हत्वदर्शक संबोधन ( लहानाला किंवा सत्कारार्थी योजतात ). जरी स्वधरर्मैकनिरत । वर्ताला बापा । - ज्ञा ३ . १०२ . - वि . फार ; पुष्कळ ; मोठा . बापु उपेगी वस्तु शब्दु । - अमृ ६ . १ . - उद्गा . आश्चर्य किंवा दु : ख यांचें दर्शक . बाप ! अज्ञानाची भुलि कैसी । - भाए ३ . १५ . [ सं . पिता , वप्तृ ; प्रा . बप्प , बप्पो ; का . बाप्प ; पोर्तु . जि . पतरौ , पात ( पितृशीं जास्त जुळणारा ); आर्मेजि . बाप ] म्ह० बापास बाप म्हणत नाहीं तो चुलत्यास काका कोठून म्हणणार ? बापासि बाप न म्हणे ऐशासी काय होय आजोबा । - मो . ( वाप्र . ) बाप शेटीची पेंड , बाब शेटीची पेंड - स्त्री . हवी त्यानें हवी तितकी न्यावी अशी वस्तु ; संपत्ति ; विपुल व सुसाध्य वस्तु . ( बापशेट नांवाच्या श्रीमान व उदार गृहस्थाच्या नांवावरुन हा शब्द रुढ झाला असेल ).
०होऊं   , म्हणविणें , बाप होऊन करणें , बाप होऊन बोलणें - बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें ; वर मोठेपणा मिरवणें . एखाद्याचा बाप होणें , बाप लागून राहणें - एखाद्यापेक्षां वरचढ असणें ; त्रास देणारा असणें . बापाचा माल - एक शिवी ; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लागल्यास त्यास म्हणतात . बापावरुन पावणें - बापाच्या नांवानें , बापावरुन शिव्या देणें . बापास बाप म्हणणें - वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें . बापास बाप म्हणणारा - भीड मुर्वत न धरणारा ; खडखडीत स्वभावाचा .
लागणें   , म्हणविणें , बाप होऊन करणें , बाप होऊन बोलणें - बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें ; वर मोठेपणा मिरवणें . एखाद्याचा बाप होणें , बाप लागून राहणें - एखाद्यापेक्षां वरचढ असणें ; त्रास देणारा असणें . बापाचा माल - एक शिवी ; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लागल्यास त्यास म्हणतात . बापावरुन पावणें - बापाच्या नांवानें , बापावरुन शिव्या देणें . बापास बाप म्हणणें - वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें . बापास बाप म्हणणारा - भीड मुर्वत न धरणारा ; खडखडीत स्वभावाचा .
०आजांचा   - पु . पूर्वजांचा धर्म ; पिढीजात आलेला धर्म . बापई - पु . ( माण . ) बाप्या ; वयांत आलेला पुरुष .
धर्म   - पु . पूर्वजांचा धर्म ; पिढीजात आलेला धर्म . बापई - पु . ( माण . ) बाप्या ; वयांत आलेला पुरुष .
०घर  न. माहेर . मग आप - घर त्यागूनि बापघरीं केली वस्ति । - सप्र ११ . ४९ .
०जन्मांत   जन्मीं - क्रिवि . सर्व आयुष्यांत ; जन्मापासून आजपर्यंत . मी बापजन्मीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं . [ बाप + जन्म ]
०जादे   दादे - पुअव . वाडवडील ; पूर्वज . दिल्ली याचे बापजाद्याची नाहीं , जो सामर्थ्यवान होईल त्याची दौलत असें आहे . - गोखंचिशाब १२ . [ फा . बाब = पिता + अर . जद्द = आजोबा ]
०पण  न. सामर्थ्य ; पितेपण . तरि बापपण आपुलें कां दाखविजेना । - ऋ ३४ . पोरका वि . बाप मेल्यामुळें पोरका बनलेला .
०भाऊ  पु. भाईबंद ; भाऊबंद ; नातेवाईक ; दायाद ( वतनांतील वांटेदार ).
०भावकी  स्त्री. 
भाऊबंदकी ; नातें .
दाट परिचय ; परमस्नेह .
०भ्रम  पु. मोठा भ्रम . बापभ्रमाचें विंदान । केवढे सायास पक्षियांचे । - जै ७७ . ५४ . [ बाप = मोठा + भ्रम ]
०माय  स्त्री. ( काव्य . ) बाप आणि आई ( हा शब्द विशेष रुढ नाहीं . रुढ शब्द मायबाप , आईबाप , मातापिता हे आहेत ). जैसी अबला सासुरां राहे । चित्तीं आठवे बापमाये । बापया , पु . बाप्या ; पुरुष . बापयोद्धा पु . मोठा योद्धा . बापयोद्धा तो नि : शंक । - जै ७५ . १२६ . [ बाप = मोठा + योद्धा ]
०रोटी   बापुती बापोती - स्त्री . ( हिं . ) ( शब्दश : अर्थ - बापाची भाकरी , अन्न ). वडिलोपार्जित चालत आलेली वतनवाडी , मालमत्ता . बापा - पु .
( खा . ) बाप .
बापाचें संबोधन ; ( आदरार्थी हाक मारतांना ) अहो ! अरे ! अर्थाचा दास पुरुष अर्थ नव्हे पुरुषदास बापा हें । - मोभीष्म १ . ९० .
( कों . ) एक पिशाचदेव ; बापदेव . बापाजी - पु . ( संबोधन ) मोठ्या माणसाला हाक मारतांना म्हणतात . बापाजी ! आम्हीं हीं चित्रें तुमचा अनुग्रह चितारी । - मोउद्योग ११ . ५२ . बापाला - पु . ( गो . ) मावशीचा नवरा . बापाशीक झंवरी - वि . ( हेट . ) एक शिवी . बापाशीं संभोग करणारी . बापिक - पु . कुलपरंपरागत धर्म ; हव्यकव्य ; कुलधर्म . - वि . कुळांतील ; कुलपरंपरागत . एथ स्वामीचें काज । ना बापिकें व्याज । - ज्ञा १२ . ६७ . बापु - वि . मोठा . - उद्गा . बापरे ; अरे बापरे ! बापु ! कळा वानु कैसी । - ऋ ६ . बापुरजदा , बापूरजदा , बापुरझदा , बापूरझदा - वि . वंशपरंपरा . बापूरजदा घेत जाऊन ... - वाडथोमारो २ . १०६ . बापुलभाऊ , बापोलभाऊ , बापुलभाव , बापूलभाव - पु . ( गो . ) चुलत भाऊ . बापुलयों , बापोलयों - पु . ( गो . ) चुलता . बापुला , बापुय , बापूय , बापुस , बापूस - पु . ( गो . कु . कों . ) बाप . बापू - पु . आदरार्थी पुरुषास म्हणतात . बापोलभैण - स्त्री . ( गो . ) चुलत बहिण . बाप्या , बाप्यो - पु . बाप होण्याच्या वयाचा , वयांत आलेला पुरुष ; प्रौढ . ( - अव . बापे - प्ये ). बाप्यामाणूस - पु . पुरुष . याच्या उलट बाईमाणूस .

बाप     

बा पहा.

Related Words

आकाशांतला बाप   (गु.) बापाने बाप नहि कहुं तो पडोसीने काको केहवानो?   बाप   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   आई सोसणार नि बाप पोसणार   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   बाप का बाप   पापाचा बाप   बाप म्हणविणें   माय मरुन बाप मावसा   चूक नव्हे, चुकीचा बाप   बाप होऊन लागणें   बापास बाप न म्हणणें   जसा बाप, तसा लेंक   बाप म्हाली, माय तेली   बाप होऊं लागणें   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   आप घर कीं बाप घर   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई मेल्यावर बाप मावसा   गायीचा बाप   कहूं तो मा मरजाइगी ना कहूं तो बाप कुत्ता खाजाइगा   आसका बाप, निरासकी मा   आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे)   एखाद्याचा बाप लागून राहणें   एखाद्याचा बाप होणें   कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा   कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर   लढो बाप रोटी पकती है !   बाप जातो देऊळीं, पोर्‍या जातो राऊळीं   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   जब बाप मरेंगें, तब बेल बटेंगें   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   parent   باپ کاباپ   বাপেরও বাপ   ବାପାଙ୍କ ବାପା   બાપનો બાપ   ਬਾਪ ਦਾ ਬਾਪ   बाजे   बिफानि बिफा   അതി കാലന്   बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   सावत्र बाप   सौतेला बाप   बाप-दादा   माँ बाप   मां बाप   माई-बाप   father   superior   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   बाप आजांचा धर्म   बाप चोर, पोर्‍या हाताळ   बाप होऊन करणें   बाप होऊन बोलणें   बापास बाप न म्हणणारा   पापाचा बाप पैका   गुरुः   ওস্তাদ   जाणकार   बाप करे बाप पावे बेटा करे बेटा पावे   बाजारचा मेवा, बाप लेकांनीं खावा   बाप मरतांच घर अंगावर पडलें   बाप मरेल बैल वांटा पडेल   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   बाप आला पाव्हणा न् निजला उताणा   बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला   बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा   बाप तसा बेटा, झाड तसें फळ   बाप तसें मूल, झाड तसें फूल   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   बाप मेला आणि भावानें दावा केला   दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   माय बाप हेल्या, लेकरं पाहिलं कोल्ह्या   मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   male parent   begetter   stepfather   superordinate   बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP