रूप एक नाम तुझी रे अनंत । परब्रह्मा देवा तुला दंडवत ॥धृ॥
कुणाचा कन्हैया कुणाचा गोविंद । कुणी विष्णू भजनी सदा राहे धूंद ।
कुणी निलकंठ पुजितो मनात ॥१॥
कुणी सांकडे घालितो विठ्ठलासी । कुणी आळवी त्या राघवासी ।
कुणाच्या वसे तो दत्त चिंतनात ॥२॥
माझा रोम रोम तुझ्या नामी रंगे । तुझी मुर्ति माझ्या नयनी तरंगे ।
मज मज पामराशी देई देई हात ॥३॥