श्री वशिष्ठ गुरुंची आज्ञा वंदूनि आला तो राजा दशरथ कौसल्येच्या महाला । स्थूल देह वरती तोही चढला देह सुक्ष्म माझ्या घरी संशयात तो चढला कारणे कोठडीत पाहे नृपति तो मा कारण जा ये त्वरीत तो । हो द्वारी उभी नच राहे म्हणत तो शोधिता परस्पर परसी पाहूनी तिजला म्हणे रुसूनी बसली निर्विकल्प छायेला ॥१॥
घे योगी जनांना योग्य साधिता न मिळे, ती कौशल्याने पूर्ण ब्रह्मा साठविले तिज जवळी बैसूनी राजा दशरथ बोले पूरवीन कामना इच्छीतया वेळ । ती निजानंद आनंदी रंगली ती द्वैतपणाची बोली विसरिली तिशी गोष्ट विचारीतो राजा मागली आठवते का तुला, का, वर्हाड बुडवून गेला पौलस्यतनय तो मस्त्य मुखी दे तुजला ॥२॥
बोलते कुठे रावणभूज आपटोनी ती उठली शत्रूचे नाम ऐकना श्रवणी म्हणे चाप बाण दे दाही शीर उडवूनी मी क्षणात टाकीन कुंभकर्ण मारोनी, त्या इंद्रजिताला बाणे जर्जर करुनी धाडिला यमपूर बंधू सहाय्य घेऊनी घेई शशांकवाने नवरत्नाची माळा मी चाप भंगीता घालीन भूमीबाळा घे अननसे आंबे, द्राक्ष, जांभळे या वेळा मी प्रिया शोधिता देईल शबरी मजला. घे घास घास रति सुंदरी, हनुमंत दास तो माझा महीवरी नौकेत बसे तो जलक्रीडा तो करी, प्रिय भक्त गुहक मज नेई पर तीराला ही लाल पैठणी पांघर भरजरी शेला ॥३॥
हे कार्य करीन मी पाळूनी ताता आज्ञेला आधी व्यथा विरहित चालवीन राज्याला मी पुत्रहीन तुज शरण असे गुरुराया करी कौसल्येला सावध आज लवलाया म्हणे वशिष्ठ बघूनी घाबरती का वाया हिज उदरी अवरते खचित खचित प्रभुराया, म्हणे सत्य सत्य ही वाणी मानी रे हीस पिशाच्च बाधा नाही जाणी रे हरी शंख चक्र शेषासह अवतरे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवसी रामा अवतरले ही कृष्णादिनी रुंजी घाली पदकमला ॥४॥