भोळ्या माझ्या महादेवा , आवड तुला बेलाची ॥धृ॥
गळा शोभे रुंडमाळा रुप सुंदर सावळा ।
कपाळी कोर चंद्राची, आवड तुला बेलाची ॥१॥
हाती शोभे त्रिशुल डमरु , शंख वाजे नाना छंद ।
अंगी उटी विभुतीची आवड तुला बेलाची ॥२॥
अर्धांगी पार्वती पुढे शोभे गणपती ।
जटेमधुनी गंगा वाहती, आवड तुला बेलाची ॥३॥
नन्दीवरी झाले स्वार पुढे चाले हरिहर,
महानन्दा जोडुनी कर आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची ॥४॥