सुख सदनीं तो श्रीहरी असतां, वारा घाली भिमक दुहिता,
सहज विनोद प्रभु ते बोले, करु लागे राज्य बाळे तु फसली गे राज्यबाळे ॥धृ॥
गोकुळांत मी खेळ खेळलो, गोपीचा मी चाकर झालो, नंद यशोदे गृही राहिलो ॥१॥
राज्य सत्ता ही काही न मजला, नंद गृहाच्या गोधन गोरस गोपी गृही चारीले ॥२॥
शिशुपालादिक वर योजीले अवचित कां गे मजसि वरिले, अजूनी तरी बघ उघडी डोळे ॥३॥
ऐलूनी हरीची बोधवाणी, घाबरी होऊनी पडली धरणीं, तव त्या हरीचे मन कळवळले ॥४॥
निज हस्ते तब उठवूनी तिजला, देतो आलींगन प्रेम भरुनी, पिताबंर तव पुशिले डोळे ॥५॥