श्रीहरी पुसे डोहाळे करी इच्छा मज वेल्हाळे मुखचंद्र सुकूनी का गेला हा मास प्रथमची आला प्रियांत पालट झाला । बहु तेज चढे रूपाला उभी द्वारी चवथी मासी करी विनोद सखया तिजसी अतिमंद हास्य ते केले कधी ॥१॥
लागला मास पांचवा बागेमध्ये मंडप भरला चौरंगी सखी भरविती षड्रस अन्न वाढिती सखी फळ मिळाले सगळे ॥२॥
मग सातव्यांत बसली जोडीने तव ओटी भरली आठव्यात हौस बहू केली आठगूळ करी वनमाळी उंबरे माळ घातली मस्तकी फुलांची जाळी करी कौतुका जातां फार सुकुमार दिसे सुंदर पुरविले सर्व डोहाळे करी, तो झाले बारा दिन मग नांव ठेविले मदन लक्ष्मीने मी पाहिले कधी ॥३॥