बांधा उखळीला याला बांधा उखळीला याला । नंदाच्या पोरयाला बांधा उखळीला ।
पाण्या जाता घागर फोडितो । भर रस्त्यावरी पदरच ओढी । लाज नाही याला हो लाज नाही याला ॥१॥
प्रात:काळी हा मज घरी आला । दही दूध लोणी चोरुनी गेला ॥ सासु मारील मला हो सासू मारील मला ॥२॥
मध्यरात्री हा मज घरी आला वेणी खूंटीला बाधूनी गेला पडला मी हा फिदी फिदी हसला ।
लाज नाही याला नाही याला ॥३॥
कृष्णा कृष्णा खोड्या कसल्या । बांधून ठेविन या उखळीला सोडू नका याला हो सोडू नका याला ॥४॥
खट्याळ गौळण करिती चहाडी केली नाही मी ह्याची खोडी सोड बाई मला आता सोड बाई मला ॥५॥
पाण्या जाती यमुना काठी कृष्ण येई हा आमुच्या पाठी । सोडू नको हो ह्याला सोडू नका ह्याला ॥६॥