वैकुंठीच्या श्रीरंगाने काय लाघव केले । बाळ रुप घेऊनीया सकळा मोहियले । माय गृहा जाता याने उखळी पाडियले यमलार्जुन वृक्षावरी पुर्ण कृपा केली । खोडी करीता यशोदेने उखळी बांधीयले । दामोदर नाम ऐसे प्रसिद्ध जाहले ॥ गोपी जाती गोरस विकण्या । आडविती आडवाट, खाता नवनीत हासे चक्रपाणी । यामुनेच्या डोहामध्ये कालिया माजला । शिरी त्याच्या नाचोनीया गर्व भंग केला । दास म्हणे प्रेमभरे पाहु ऐसा देव । हृदयात सांडूनीया नको दूजा भाव ॥