कृष्णा मजकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून ॥धृ॥
डोईवर घागर हातामध्ये झारी । वेणीच गेली सुटून ॥१॥
भिंती आड लपूनि माझ्या जवळी । नाहाणीत नहाते जपून ॥२॥
शाम हा सुंदर अति मनोहर । बहर हा घ्यावा लुटून ॥३॥
माणिक प्रभू म्हणे प्रीतिची राधा । हरी चरणी लागे जपुन ॥४॥