आले कान्हा तु मुरली वाजविली, तहान भुक सरली , वृत्ती गुंग केली ॥धृ॥
यमुनेतही तु जगजेठी गळा घालिसी मिठी, लाजमनी ना धरीली ॥१॥
सासुच्या प्रति गूज सांगसी , सून चोरटी म्हणसी, लोणी ओठी लाविसी, अशी करणी कसली ॥२॥
यमुना जला, आम्ही जाताना, कारे अडविशी कान्हा व्यर्थ छळीसी आम्हा, वृत्ती बहु घाबरली ॥३॥
नन्द नन्दना हे मधुसुदना, ध्यास आहे सुमना विनवी लक्ष्मी कन्या पदरी घे वनमाली ॥४॥