भाळी अर्धंचंद्र माथी शुभ्र गंगा, लेपीले सर्वांगा चिताभस्म ॥धृ॥
गळा सर्प माळा त्याला व्याघ्रांबर शिवता शंकर सत्य तो ॥१॥
शंख शिंग नाद गर्जती शिवगण, पाही भक्तजन ओळगंती,
भोळा सदाशिव पावतो भक्तीसी, उद्धरी दीनासी निळकंठ ॥२॥
हर हर शंकर सांब सदाशिव त्रिपुरारी ॥३॥