विठोबाचे गळा शोभे तुळशीहार । बुक्का वाहुनिया करू नमस्कार ॥धृ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । चरणाचे तीर्थ भीमा चंद्रभागा ॥
पुंडलिका साठी घेई अवतार ॥१॥
भावे पुरवावी भक्ती रमापती । रमा हा मोगरा अर्पूण शेवन्ती ॥
नामाचिये संगे हाची गजर ॥२॥
विठ्ठलाचे चरणी ठेवोनिया माथा । अखंड तु देवा राहे माझे चित्ता ॥
भक्त मागतसे हाची एक वर ॥३॥