हले हा नंदा घरी पाळणा, त्यात देखणा गोजरिवाणा हंसतो गोकुळराणा ॥१॥
ओठ लाल ते डोळे चिमणे हास्यांतूनी त्या फुले चांदणे । स्वरुप लोभसवाणे मोहून घेई मना ॥२॥
बोल बोबडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदांचे । रुण झुणताती घुंगुरवाळे ये धेनूंना पान्हा ॥३॥
नंद यशोदा करती कौतुक आनंदाचे अमापते सुख माय पित्याविण कसे कळावे सौख्य त्याचे कुणा ॥४॥