अलिंगुनी अंगीकार बाप रखुमाईच्या वरा, सोडूनीया घरदार सखु आली पंढरपुरा ॥१॥
अणवाणी पायपिटी किती केली आटापाटी, सगुणरुप भेटीसाठी तोडिल्या मी बंधन गाठी ।
तुळशीहार घाली कंठी विठुचीया संसारा ॥२॥
संत तुकोबाची वाणी भक्तीचे ती शिकवणी, लागतां मी तुझ्या भजनी थकिली ही सुवासिनी ।
सर्वसाक्षी ज्ञानी तुका ठावे परमेश्वरा ॥३॥
सार्या इंद्रियांचे प्राण डोळियांत व्याकळुन, मायबाप तुका शरण मागते मी विनवून ।
दिला जन्म देई मरण लेकीला या विश्वंभर ॥४॥