मुकुंदा रुसू नको इतुका, विनविते तुझी तुला राधिका, तुझ्या मुरलीला आतुरलेली गवळ्याची मी गौळन भोळी तू माझा मी तुझी सावली नको रे राग धरू लटका ॥१॥
खिन्न होऊनी तुझियासाठी, नाच थांबला यमुना काठी गोपीनाथ तू माझ्या भोवती जमल्या सार्या या गोपिका पुन्हा एकदा पहा विचारुनी, तुझे तुला तू मना पासूनी । नाही तर तुझ्या वाचूनी मंजूळ नाद येईल का ॥२॥