शास्त्र न पढले तप ना आचारीले, पुण्य जोडीले कायऽऽसहज लाभले पाय गुरुचे ॥धृ॥
गुरु शोधासी नसे भ्रमती कधी मानसी नव्हेची अंती, चुकल्या बाळा पदरी घ्याया कळवळली गुरुमाय ॥१॥
बोध दुधाची स्रवते सर्रास, दयद्रिमाता बाळा करीता, मोक्ष सुखाची ईथेच दुभती ही वत्छाची गाय ॥२॥
फळले का मग पुण्य म्हणावे, गुरुच्या करुणे काय म्हणावे, पतीत जाणूनी तरी ही दीना घेई उरी गुरुमाय सहज ॥३॥