घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पाहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी रुपी गुंतले लोचना, पायी स्थिरावले मन देहभान हरपला, तुज पाहता विठ्ठला, तुका म्हणे जीवा नको सोडू केशवा ।