नेसले ग बाई मी साडी जरी बुट्याची तिरकी नजर माझ्या वरती सांवळ्या नेत्री घातले अंजन । भांगी भरला रे , माळली ग केसावरी फुलवेणी चमेलीची । पैंजण पायी माझ्या । चाल माझी ही तालात कुंडलेच कानी डुलती । चाल माझी हो ठेक्यांत । किती सांगू विठ्ठला रे । रीत माझी गरतीची । मुरलीच्या नादाने । बावरले मी ग भारी । यमुनेच्या पाण्या जाता । कडे घेतली घागरी । ओढ लागे अंतरीया हरीच्या ग संगतीची । तिरकी नजर माझ्या वरती सावळ्या हरीची ।