वाकूनी टाक सडा ग राधे । वाकूनी टाक सडा । अंगण झाले ओले चिंब उडवू नका शिंतोडे ।
वाकूनी टाक सडा । कुंतल कुरळे भूरभूर उडती बांधून ठेव जरा ॥१॥
हिरवी साडी हिरवी चोळी हातात नवा चुडा ॥२॥
जन हे सारे टकमक बघती थुंकूनी टाक विडा ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने श्रीरंग झाला ग वेडा ॥४॥