तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम । तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम ॥
वसो तुझे नाम माझ्या मुखीऽऽ तुझे भक्ती ॥धृ॥
सदभक्ती विचार राहो मज चित्ति हेची कृपा द्यावी मज ॥१॥
तुझा दास जगी म्हणवितो विख्यात पसरिला हात फिरवू नको ॥२॥
नामा म्हणे देवा इतुके देई मज ऐकोनी केशवराज काय बोले ॥३॥