सांगा बाई कुठे वेणु वाजला । नादाने जीव माझा घाबरला ॥धृ॥
डोईवर घागर हातात झारी गेले पाण्याला । रस्ता चुकले झापड पडली, भान नाही मला ॥१॥
सकाळचे तर काम करूनी बसले सारवायला । पाणी म्हणुनी दुध ओतले शुद्ध नाही मला ॥२॥
नाहुनी धुऊनी बसले मी होते गडे स्वयंपाका हातात उन्डा गडबड गुंडा तव्यावर हात पडला ॥३॥
हात भाजला नाही पहिला, बारा दिवसाचे बाळ तान्हुले घेतले मांडीवर ।
नाद मुरलीचा मंजुळ आला माझ्या कानावरी खाली ठेबिला बाळ सोनुला ॥४॥
सर्व गौळणी टिपर्या खेळती कृष्ण संगतीन । भेदा-भेद न काहीच उरला गोपी कारणे ।
एका जनार्दनी हरिची लीला प्रभूची लीला ॥५॥