या मीराचे भाग्य उजळले, गिरीधर माझ्या स्वप्नी आले । आळवीत मी होते भजनी देखियले नव्हते नयनांनी ।
आज मला ते सौख्य लाभले, व्यथा मनाची आता सरली जन नींदेची भीती उरली, भव सागर मी तरले तरले मीरे संग नाचे मोहन तालही धरती पायी पैंजण, रात्र संपली केव्हा न कळे ॥