नकोरे कृष्णा मी गवळ्याची नार, फाटेल साडी जरीची किनारा ॥धृ॥
धुणे धुत होते मी यमुनेच्या तिरी, अवचित धरली माझी वेणी, हात जोडित नंदकुमार ॥१॥
कुठवर सोसू मी हरिचा जाच, घरी दारी करिते सासु मला जाच, पाया पडते नंदकुमार ॥२॥
एकाजनार्दनी निश्चय मनीचा, राधेसाठी धरिला याने अवतार ॥३॥