दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे ॥धृ॥
अनुसूयेचे सत्य आगळे तिन्ही देवही झाली बाळे ।
त्रैमूती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभूवन सारे ॥१॥
तिन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर किती वदना वरती ।
जटा शोभे शिरी पायी खडावा, भस्म विलेपीत कांती साजे ॥२॥
पाहूनी प्रेमळ सुंदर मुर्ती, आनंदाचे आसू ढळती ।
सारे सात्विक भाव उमटती हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगबंर दैवत माझे,
हृदयी माझ्या नित्य विराजे ॥३॥