यशोदे कृष्णाला सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥धृ॥
अवघ्या गौळणी मिळोनी । यशोदेसी सांगती गार्हाणी ।
याच्या पायी गोकुळ सोडावे ॥१॥
अनया गौळी करी धंदा । त्याची आहे मी राधा ।
हरीला उखळासी बांधावे हरी हा विश्वाचा जनिता ॥२॥
भानुदास चरणी ठेवी माथा । प्रभुच्या चरणासी लागावे ॥३॥