अजुन नाही जागी राधा अजुन नही जागे गोकुळ , अशा अवेळी पैलतीरावर आज घूमे का पावा मंजुळ मावळतीला चंद्र केशरी पहाटवारा वरती भणभण अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून आपुले तनमन विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यामधले थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव ।