मृदुल करानी छेडिता तारा स्मरते रुप हरीचे मीरा कमल दलापरी मिटल्या अधरी नाम मनोहर खुलता श्रीहरी हर्षभराने तनु लतिकेवरी पडती अमृतधारा ॥१॥
कालिंदीच्या नील जलापरी हृदयी वाहे भक्ती हसरी, तन्मयतेच्या कुंजवनी तिरी फुलवी प्रीत फुलोरा ॥२॥
सालस भोळी धीर मनाची मीरा दासी प्रभुचरणांची मिटल्या नयनी धुंद मनांची रंगली हसरी मथुरा ॥