अरे पंढरीच्या विठू माझ्या पंढरीच्या विठू ॥धृ॥
माझ्या एकाही हाकेला नाही मिळाले उत्तर तुझी मूर्ती का पत्थर ॥१॥
महाधीर भयंकर भोवर्यात माझी नाव मला वाचव वाचव ॥२॥
ज्याचा नाही कुणी जगी त्याचा आहे तू रे वाली न्याय मला दे माऊली ॥३॥
न्याय नितीचा ना चाड कलियुग सुरु झाले तुझे जग बदलले ॥४॥