देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा, विठु राहे पंढरपुरी वैकुंठच हे भूवरी भीमेच्या काठी डुले भक्तिचा मळा साजिरे रुप सुंदर कटि वसे पितांबर, कंठात तुळशीचे हार कस्तुरी टीळा, भजनात विठू डोलतो किर्तनी विठू नाचतो रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा । भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी, काजळी रात्रीस होसी तूच तारा वादळी नौकेस होशी तूच किनारा मी तशी आले आज तुझ्या दारी ॥१॥
भाबडी जनी गाताच गाणी दाटूनी आले तुझ्या डोळ्यात पाणी, भक्तीचा वेडा तु असा चक्रधारी ॥२॥
शापीलेली ती अहिल्या मुक्त केली आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली, वैभवाचा साज नाही मी भिकारी ॥३॥
अंतरीची हाक वेडी घालत रे वाट काट्याची अशी मी चालते रे, जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी ॥४॥