खेळ मांडीयला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे ॥धृ॥
क्रोध अभिमान गेला वावटळी एकमेका लागतील पायी रे ॥१॥
गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिळविती गळा रे ॥
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे ॥२॥
वर्ण अभिमान विसरली आहे एकमेका लोटांगणे जाती ॥
निर्मल चित्ती झाली नवनीती पाषाणा पाझर फुटती रे ॥३॥
होतो जयजयकार गर्जत अंबर नाचती वैष्णव वीर रे ||
तुका