सती अनसुया थोर भाग्य उजळले । ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ॥धृ॥
आश्रमासी आले देव भिक्षा मागतात । नग्न दिगंबर व्हावे ऐसे बोलतात ।
पतीव्रता मन तेव्हा, खुप गोंधळले ॥१॥
स्मरण पतीचे केले, तिर्थ शिंपडले । आली रांगत खेळत लडी बाळ बाळे ।
सत्व हरावया गेले स्वत:च हरले ॥२॥
दुग्ध पान बाळा दिले त्यानां तृप्त केले । बाळा जो जो रे अनुसूया बोले ।
भाग्यवान अनुसूया देव खेळविले । ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ॥३॥